मुंबई - विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी राज्यभरातील आमदार मुंबईत आहेत. अधिवेशनाचा पहिला दिवस राजकीय आरोप प्रत्यारोपांनी गाजला. परंतु एक इंटरेस्टिंग गोष्ट विधानसभा भवनापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मरीन ड्राईव्ह परिसरात घडली. समाजमाध्यमांवर या घटनेचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांची समाजमाध्यमांवर एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. काळे राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत अधिवेसनाचा पहिला दिवस संपल्यानंतर मरिन ड्राइव्हला फेरफटका मारायला गेले होते. यावेळी तेथे काही तरुण गृपमध्ये बसले होते. त्यांनी भरणे यांना ओळखलं नाही. त्यातील काही तरुणांनी थेट काका आमचा फोटो काढा ना म्हणत थेट राज्यमंत्री भरणेंच्या हातात फोन दिला.
याविषयी आशुतोष काळे त्यांच्या समाजमाध्यमांवर लिहतात की,. ' आज विधिमंडळाचे कामकाज आटोपल्यानंतर सायंकाळी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत मरिन ड्राईव्हला फेरफटका मारत असताना काही मुलांनी भरणे यांना न ओळखता आमच्या ग्रुपचा फोटो काढता का म्हणून विचारणा केली, भरणे यांनी लगेच मुलांच्या हातातील मोबाईल घेतला आणि त्यांचा गृप फोटो काढला. त्यामुळे त्यांचाही फोटो काढण्याचा मोह मला आवराता आला नाही. महाराष्ट्रासारख्या एका मोठ्या राज्याचे मंत्रिपद सांभाळणाऱ्या भरणे यांचा साधेपणा मी माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला.”
यापुढे काळे म्हणतात की, 'मोठी माणसे उगाच मोठी होत नाहीत. पदाचा मोठेपणा मिरवण्यापेक्षा सामान्य माणसात सामान्य होऊन राहण्यात देखील मोठेपणा असतो. आदरणीय पवार साहेब यांच्याकडून ही गोष्ट नेहमी शिकायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पवार साहेबांच्या तालमीत तयार झालेला प्रत्येक जण त्यांनी दिलेल्या विचारांनीच वाटचाल करत आहे यात शंका नाही,'
Dattatray Bharne and Ashutosh Kales post on social media went viral
------------------------------------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.