मुंबई

कुख्यात गुंड एजाज लकडावालावर खंडणीचा आणखी एक गुन्हा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: गुंड एजाज लकडावाला विरोधात खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेने एजाज लकडावाला याला तळोजा कारागृहातून ताब्यात घेतलंय. खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या एजाजविरुद्ध हॉटेलच्या मालकाकडून २ कोटी रुपये खंडणी मागितल्याचा आरोप आहे. एजाजने पीडितेला इंटरनॅशनल नंबरवरून फोन करून धमकावून व्यवसाय नीट चालवायचा असेल तर दोन कोटींची खंडणी मागितली होती. एजाजला गेल्या वर्षी पाटणा येथून अटक करण्यात आली होती. (Ejaz Lakdawala)

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा जवळचा मित्र व सहकारी एजाज लकडावाला हा मोस्ट वाँटेड आरोपी आहे. गेली अनेक वर्ष पोलिस त्याच्या मागावर होते. सरतेशेवटी, सापळा रचून मुंबई पोलिसांनी त्याला पाटणा विमानतळावरून गेल्यावर्षी अटक केली होती. 2003 मध्ये बँकॉकमध्ये झालेल्या एका हल्ल्यात एजाजचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. मात्र, तसे नसून तो वेश व देश बदलून राहात होता. गेले काही दिवस तो कॅनडामध्ये राहात होता. त्याच्याविरूद्ध मुंबई, दिल्ली व महत्त्वाच्या शहरांमध्ये हत्या, खंडणी व या सारखे अनेक प्रकारचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. (Ejaz Lakdawala)

याआधी एजाज त्याला कोरोना झाल्यानंतर चर्चेत आला होता. त्यावेळी त्याला जी.टी. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. एजाज विरोधात हत्या, खंडणी सारख्या 80 हून अधिक तक्रारी असून मुंबईत 25 गुन्ह्यांची नोंद आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT