Sanjay Raut सकाळ डिजिटल टीम 
मुंबई

Sanjay Raut : राज्य फडणवीसच चालवत आहेत, बाकीचे उंडाराहेत - संजय राऊत

तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर संजय राऊतांनी पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंवर टीका केली.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली. सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच राज्य चालवत आहेत बाकीचे फक्त उंडारत आहेत, अशा शब्दांत त्यांनी हल्लाबोल केला. (DCM Fadnavis is running Maharashtra CM Shinde just roming here and there says Sanjay Raut)

संजय राऊत म्हणाले, "महाराष्ट्रातील राजकारणातील कटुता संपवावी असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय हे महाराष्ट्राला शोभणारं आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आम्ही राजकीय लढाया लढू पण मी त्यांना यासाठी भेटणार असं म्हटलं कारण सध्या राज्य तेच चालवत आहेत, बाकीचे नुसतेच उंडारत आहेत"

हेही वाचाः कोणाचे हिंदुत्व शाश्वत...बापुंचे की संघाचे?

मी तुरुंगात असताना मला काही प्रश्न दिसले तिथं तुरुंगातील कर्मचाऱ्यांचे काही प्रश्न आहेत. त्यामुळं गृहमंत्री म्हणून त्यांच्यासमोर हे प्रश्न मांडले पाहिजेत. तुरुंगात गेलेल्या माणसाला जे आयुष्य भोगावं लागतं तसेच तुरुंग कर्मचारी आहेत त्यांच्या यातना मी डोळ्यानं पाहिल्या आहेत, यासाठी त्यांचे प्रश्न मी त्यांच्यासमोर मांडायला गेलो तर त्यात चुकीचं काय आहे, असं स्पष्टीकरणही यावेळी राऊत यांनी दिलं.

देशाची घटना गोठवण्याचा प्रयत्न होतोय

आमच्यासारख्यांना बेकायदेशीर अटक होणं हे या देशाची राज्यघटनाच गोठवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळं मी तुरुंगात असताना ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्यात शिवसेनेचं चिन्हं गोठवणं हे काही वेगळं नाही, असंही यावेळी संजय राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT