nair hospital 
मुंबई

धक्कादायक! नायर रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेची आत्महत्या

सकाळवृत्तसेवा

मुंबई :आग्रीपाडा येथील नायर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित 29 वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. वरळीतील जिजामाता नगर येथील रहिवासी असलेल्या या महिलेवर नायर रुग्णालयातील वार्ड क्रमांक ३५ मध्ये कोरोनाचे उपचार सुरु होते. पहाटे चारच्या सुमारास बाथरूममध्ये गळफास लावून या महिलेने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. 

दरम्यान, या महिलेने नैराश्येतून आणि कोरोनाच्या भीतीने आत्महत्या केल्याचे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि पालिका रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले आहे. ही महिला कोरोनामुळे नैराश्यात होती. त्यातून या महिलेने ही आत्महत्या केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी आग्रीपाडा पोलिस चौकशी करत आहे.

दरम्यान, वरळीचा भाग असलेल्या जी-दक्षिण विभागात 300 हून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले असून अनेक परिसर सील करण्यात आले आहेत. जिजामाता नगर परिसरातील रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अनेक नागरिकांना पोद्दार रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT