BMC sakal media
मुंबई

स्मशानभूमीत मृत्यू प्रमाणपत्रासाठी लूट; BMC कडून नोंदणी कारकून निलंबित

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महापालिकेच्या स्मशानभूमीमध्ये मृत्यू प्रमाणपत्रासाठी (Death certificate) बेकायदेशीररित्या ३०० ते ५०० रुपये उकळले जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात फसवणूक (certificate fraud) झालेल्या व्यक्तीने ट्विट केल्यानंतर पालिकेने (BMC) बोरिवली येथील बाभई नाका स्मशानभूमीतील (Borivali cemetery) नोंदणी कारकुनाला निलंबित करून चौकशी सुरू केली आहे.

पालिकेच्या कार्यपद्धतीनुसार मृत्यू प्रमाणपत्र पालिकेच्या प्रभाग कार्यालयांमध्ये दिले जाते. त्यासाठी किरकोळ शुल्कही आकारले जाते. मात्र, पालिकेच्या बोरिवलीतील बाभई नाका स्मशानभूमीत मृत्यू प्रमाणपत्रासाठी पैसे उकळले जात असल्याचा प्रकार उघड झाला. बोरिवलीतील एका व्यक्तीबरोबर हा प्रकार घडला. डिसेंबरमध्ये या व्यक्तीचे सासरे कोविडमुळे मृत पावले. त्यांचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर स्मशानभूमीतील कामगाराने त्यांना मृत्यू प्रमाणपत्राबाबत विचारणा केली, तसेच पाच प्रतींसाठी पाचशे रुपयांची मागणी केली.

या व्यक्तीने त्याला पाचशे रुपये दिले. नंतर काही दिवसांनी ही व्यक्ती प्रमाणपत्र घेण्यासाठी स्मशानभूमीत गेल्यावर मृत्यू प्रमाणपत्रासाठी विचारणा केली असता त्यांनी दिलेल्या पाचशे रुपयांची नोंद नसल्याचे कामगाराकडून सांगण्यात आले. याशिवाय तेथे आलेल्या दुसऱ्या एका व्यक्तीकडून पाच प्रतींसाठी ३०० रुपयांचीही मागणी कर्मचाऱ्याने केली असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकाराबाबत संबंधित व्यक्तीने ट्विटही केले होते. त्याची दखल घेत पालिकेने संबंधित स्मशानभूमीतील नोंदणी कारकुनाला निलंबित केले आहे. तसेच याप्रकरणी चौकशीही करण्यात येत आहे. चौकशीनंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे ट्विट महापालिकेने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra NCC Crisis: राज्य सरकारच्या लालफीतशाहीमुळे एनसीसी विस्ताराला ब्रेक; दीड लाख छात्रांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमीचा अभाव, ४०-६० टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

Mulshi Aadhaar: आधार अपडेटअभावी मुळशीतील १,२४६ विद्यार्थी अडचणीत; ३० सप्टेंबरच्या डेडलाइनने प्रशासनाची परीक्षा

Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Leopard Attack Nirgudsar: निरगुडसरमध्ये बिबट्याचा हल्ला; ब्रिडिंगसाठी आणलेला ६० हजारांचा बोकड व मेंढी ठार

SCROLL FOR NEXT