मुंबई

कल्याणमध्ये दोन बगळ्यांचा मृत्यू, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

सुचिता करमरकर

मुंबईः  कल्याणामधील गौरीपाडा परिसरात दोन बगळे मृतावस्थेत आढळले आहेत. मागील काही दिवसांपासून देशभरात बर्ड फ्लूने पक्षी मृत होत असल्याने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार परिसरातील सर्वेक्षण सुरु केले आहे. पशुवैद्यक विभागाकडून या पक्षांचे मृतदेह पुढील चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे अशी माहिती पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ प्रतिभा पान पाटील यांनी दिली. 

गौरीपाडा परिसरातील गुरु आत्मन या इमारती लगत एका झाडाखाली हे दोन पक्षी मृत असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली. काही दिवसांपूर्वी या परिसरात पाच ते सहा पक्षांचा मृत्यू झाल्याचे रहिवाशांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यक विभागाकडून या पक्षांचे मृतदेह चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेनं मार्गदर्शक सूचनांनुसार एक किलोमीटर परिघामध्ये सर्वेक्षण सुरु केले आहे. 

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Death crane Kalyan corona bird flu

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठरलं! तीन आठवडे चालणार यंदाचं पावसाळी अधिवेशन, २२ जूनपासून होणार सुरुवात, कोणते मुद्दे राहणार चर्चेत?

Video : युझवेंद्र चहलचे २९ चेंडूंत शतक! पीटरसनने दिलेलं चॅलेंज २१ चेंडू राखून पूर्ण केलं, पण त्यात Twist आहे... ; मोडला एबीचा विक्रम

२७ वर्षीय महसूल सहाय्यक तरुणीवर हल्ला करणाऱ्याला अटक, विष प्राशन करत दोनदा स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न; उपचार सुरू

Latest Marathi News Live Update : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जूनला होणार

Mumbai News: मेट्रोमुळे 'बेस्ट'ला फटका! बस थांबे तोडल्याने जाहिरातीचा महसूल बुडाला

SCROLL FOR NEXT