मुंबई

मुंब्रा येथे खड्ड्यात पडून नऊवर्षीय मुलाचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

ठाणे : मुंब्रा-कौसा परिसरात ठाणे महापालिकेच्या प्रकल्पासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून नऊवर्षीय मुलाचा मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात केवळ आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

मुंब्रा-कौसा परिसरातील अमीनाबाद इमारतीच्या जवळ ठाणे महापालिकेच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. येथे दोन दिवसांपूर्वी दोन खड्डे खोदण्यात आले. या खड्ड्यांना कुठल्याही प्रकारचे संरक्षक कुंपण नव्हते. गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास नऊवर्षीय जितेंद्र ऊर्फ जितू ताराचंद वालकेमी (रा. कौसा) हा खेळण्यासाठी घराबाहेर गेला होता. तो रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध सुरू केला. अखेर शुक्रवारी दुपारी 3च्या सुमारास खड्ड्यातील पाण्यात जितूचा मृतदेह तरंगत असल्याचे आढळले. घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मुलाचा मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढून विच्छेदनासाठी कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवला. 

पालिका व ठेकेदारावर गुन्हा नोंदवण्याची मागणी 

घटना घडलेल्या खड्ड्याभोवती संरक्षण कुंपण नव्हते. त्यामुळे या अपघाताला पालिका प्रशासन आणि प्रकल्पाचे काम करणाऱ्या ठेकेदाराचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरला आहे, असा आरोप करत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT