Mumbai Sakal
मुंबई

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर मृत्यू वाढले

यावर्षी 9 महिन्यात 65 मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाचे निर्बंध शिथिल होताच राज्यभरातील वाहतूक पूर्वपदावर आली त्यामुळेच अपघातांची संख्या सुद्धा वाढू लागली आहे. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर गेल्यावर्षीच्या नऊ महिन्याच्या तुलनेत यावर्षी जानेवारी ते सप्टेंबर यादरम्यान गंभीर, किरकोळ अशा एकूण 147 अपघातांमध्ये 65 मृत्यू झाले आहे. यामध्ये सर्वाधिक अपघात बोरघाटातील उतरत्या वळणदार रस्त्यांवर झाले असून, वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली केल्यानेही अपघातांमध्ये मृत्यूची आकडेवारी वाढली आहे.

द्रुतगती महामार्गावरील अपघात आणि मृत्यू रोखण्यासाठी महामार्ग पोलीस आणि एनजीओ च्या माध्यमातून विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहे. मात्र, वाहन चालकांच्या बेजबाबदरीपणा आणि मुळे लेन कटिंग, ओव्हर स्पीड, ओव्हर टेक, सीट बेल्टचा वापर टाळणे, वाहन चालवतांना फोनचा वापर करत असल्याने अपघातांचे कारण आढळून येत आहे. त्याशिवाय महामार्ग पोलीस आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडूनही वेळोवेळी उपाययोजना केल्या जात आहे. मात्र, यामध्ये अपयशच पदरी पडत आहे.

गेल्यावर्षी कोरोनाच्या निर्बंधांमुळे सार्वजनिक वाहतुकीवर बंदी असतानाही 9 महिन्यात 104 अपघातांमध्ये 46 मृत्यू झाले आहे. तर वर्षभरात 160 एकूण अपघात होऊन 66 मृत्यू झाले आहे. यातुलनेत कोरोनाच्या पूर्वी 2019 मध्ये वर्षभरात 306 अपघातांमध्ये 92 लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे यावर्षी सुद्धा अपघातांची आकडेवारी जास्त आढळून येत आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यानंतर वाहनधारकांना दंड करूनही वाहतूक नियमांचा वापर केला जात नसल्यानेच अपघात होत असल्याची खंत महामार्ग पोलीस विभागाकडून व्यक्त केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT