Eknath Shinde esakal
मुंबई

CM Shinde: मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या 'या' निर्णयाचा ठाणे-पालघरमध्ये होणार महायुतीला फायदा!

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचा थेट फायदा हा ठाणे जिल्ह्यातील आणि पालघर जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघांना होऊ शकतो असे पाहायला मिळत आहे.

Chinmay Jagtap

मुंबई- चार टप्प्यातील लोकसभेचं मतदान पूर्ण झाल्यानंतर आता सर्वांच लक्ष हे महामुंबईकडे लागलं आहे. यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात आणि पालघर जिल्ह्यामध्ये महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. अशावेळी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या एसटी संदर्भातल्या निर्णयामुळे याचा थेट फायदा हा महायुतीला होईल असे चित्र पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटीतून प्रवास करणाऱ्या महिलांसाठी 50% सूट जाहीर केली. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचा थेट फायदा हा ठाणे जिल्ह्यातील आणि पालघर जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघांना होऊ शकतो असे पाहायला मिळत आहे.

कल्याण, भिवंडी, पालघर या लोकसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भाग येतो. या ग्रामीण भागामध्ये रोजगाराचा अभाव असल्यामुळे याठिकाणी नागरिकांना मुंबई किंवा इतर मोठ्या शहरांमध्ये नोकरी धंद्यासाठी जावं लागतं. यात महिलांची संख्या मोठी आहे.

अशावेळी या ठिकाणहून शहराकडे जाण्यासाठी एसटीचा प्रवास महिला वर्ग करत असतात. या महिला वर्गावर कित्येक वेळा संपूर्ण कुटुंब अवलंबून असतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी एसटीमध्ये केलेल्या 50% तिकीट सवलतीमुळे त्यांचा प्रवास खर्च मोठ्या प्रमाणावर वाचत आहे. पर्यायी या भागातील कष्टकरी महिला आणि त्यांच्या कुटुंबाकडून मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचं कौतुक केलं जात असून याचा थेट फायदा हा महायुतीच्या उमेदवारांना होईल असेच चित्र पाहिला मिळत आहे.

माझ्या परिसरातील मोठ्या प्रमाणावर महिला कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी जातात. अशावेळी त्यांना एसटीमध्ये तिकिटात सूट मिळत असल्यामुळे महिलांमध्ये या निर्णयामुळे आनंदाचे वातावरण आहे, अशी प्रतिक्रिया भिवंडी येथील पौरवी वाघ यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik UPSC Exam: दोन मिनिटे उशीर अन् UPSC परीक्षा हातातून गेली! नाशिकमध्ये विद्यार्थी-पालक आक्रमक! खड्डे, पाऊस, ट्रॅफिकचा फटका

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

Marathi News Live Updates : दगडूशेठ गणपती मंडळाची जय्यत तयारी पूर्ण, वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती ठरणार यंदाच्या मिरवणुकीचे आकर्षण

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

SCROLL FOR NEXT