मुंबई

रुग्णालयात नेण्यास दिरंगाई भोवली, दोघांना तुरुंगवास 

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या रिक्षाचालकाला रुग्णालयात नेण्यात दिरंगाई केल्याने रिक्षाचालकाचा दुर्दैवी मृत्यू ओढवला होता. ही दिरंगाई अपघातग्रस्त रिक्षाचे मालक आणि त्यांचा चुलतभाऊ यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून केल्याचे सिद्ध झाले. याप्रकरणी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती राजेंद्र ताम्हाणेकर यांनी शनिवारी दोघाही चुलत भावांना पाच वर्ष तुरुंगवास आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. 

अनिल उर्फ आनंद रणदिवे (33) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव असून सुनील कोट (33) आणि स्वप्नील कोट (27) अशी शिक्षा झालेल्या चुलत भावांची नावे आहेत. चार वर्षापूर्वी घडलेल्या या घटनेप्रकरणी सुनावणीत सरकारी वकील संध्या म्हात्रे यांनी 15 साक्षीदारांची साक्ष न्यायालयासमोर सादर केली. 

कल्याण येथे राहणारे मृत अनिल रणदिवे हे आरोपी सुनील याचा भाऊ दिनेश कोट याच्या मालकीच्या रिक्षावर चालक होते. मात्र, अनेक दिवसापासून अनिल रिक्षाचे दैनंदिन भाडे देण्यास टाळाटाळ करीत होता आणि रिक्षा घेऊन गायब झाल्याने कोट कुटुंबीय आपली रिक्षा सर्वत्र शोधत होते. 18 एप्रिल 2016 रोजी दुपारच्या सुमारास कल्याण फाटा येथे कोपरखैरणेकडे जाणाऱ्या रस्त्यावर अज्ञात वाहनाची धडक रिक्षाला बसली. यात चालक अनिल गंभीररित्या जखमी झाला होता. 

दरम्यान, रिक्षाचा अपघात झाल्याची माहिती कोट बंधूंना मिळताच रिक्षा ताब्यात घेण्यासाठी सुनील व स्वप्नील दोघेही घटनास्थळी धावले. त्यांनी जुन्या वादाच्या रागातून अनिल याला उपचारार्थ रुग्णालयात नेण्याऐवजी रिक्षाचे भाडे न मिळाल्याचा तसेच, रिक्षा घेऊन गायब झाल्याचा राग मनात धरून त्याला कल्याण, मोहने, आंबिवली, उल्हासनगर या भागात फिरवून उशिरा रुग्णालयात दाखल केले.

या दिरंगाईमुळे रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने अनिल याचा मृत्यू ओढवला. याप्रकरणी शीळ-डायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर दोघा चुलत भावांना अटक करण्यात आली होती. या खटल्याची अंतिम सुनावणी शनिवारी न्या. ताम्हाणेकर यांच्या न्यायालयासमोर होऊन दोघांनाही 5 वर्ष तुरुंगवास आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: पिस्तूल, ६ जिवंत काडतुसे अन्..., अपघातग्रस्त कारमधून ९० लाखांचा मुद्देमाल जप्त

कृष्णाईच्या लेकी मालिकेत स्टार प्रवाहची अभिनेत्री मुख्य भूमिकेत, जाणून घ्या संपूर्ण कास्ट आणि प्रसारणाची वेळ

Army Cheeta Helicopter Crashes: लडाखमध्ये मृत्यूला हरवून तीन अधिकारी बचावले! भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर डोंगरात कोसळले

Best FD Return: FD वर मिळतोय 8% पेक्षा जास्त व्याज! कोणती बँक देते सर्वाधिक रिटर्न? गुंतवणुकीआधी एकदा जाणून घ्या

मित्राच्या कारमध्ये बसवून हॉटेलमध्ये नेलं अन्...; अमरावतीत अल्पवयीन युवतीवर अत्याचार; फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी

SCROLL FOR NEXT