मुंबई

एकीकडे बाबरी पाडली आणि दुसरीकडे पेटली मुंबई, कसा होता 'तो' काळ...  

सुमित बागुल

मुंबई : राम मंदिर आणि बाबरी मशीद हा वाद देशात तब्बल तीन दशकं सुरु होता. न्या. रंजन गोगोई यांनी देशातील सर्वात प्रलंबित राम मंदिर आणि बाबरी मशिदीचं प्रकरण निकाली काढलं. न्या. रंजन गोगोई यांनी राम मंदिराच्या बाजूने स्पष्ट निकाल दिला आणि  देशात भव्य राम मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा झाला.

मात्र आज राम मंदिर भूमिपूजन होत असताना, या संपूर्ण घटनाक्रमात मैलाचा दगड आणि हिंदूंसाठी सर्वात महत्त्वाचा क्षण ठरला तो म्हणजे म्हणजे बाबरी मशीद पाडली गेली गेली तो क्षण. ६ डिसेंबर १९९२ मध्ये अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात आली आणि त्याचे प्रतिसाद सर्व देशभरात उमटताना पाहायला मिळाले. मात्र या पडसादांच्या केंद्रस्थानी होतं महाराष्ट्रातील एक शहर. या सर्व पडसादांच्या केंद्रस्थानी होती देशातील सर्वात महत्त्वाची मुंबई. बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईत मोठ्या प्रमाणात दंगली उसळल्यात आणि त्याचा फटका अनेकांना बसला.

९०० जणांचा जीव गेला

एकीकडे बाबरी मशीद पाडली गेली आणि दुसरीकडे शिवसेना आणि भाजपकडून विजयी रॅली काढण्यात आल्यात. या रॅलीजच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी झाली आणि मुंबईतील सामाजिक वातावरण अतिशय संवेदनशील झालं. एकीकडे बाबरी मशीद पाडली आणि दुसरीकडे सुरु झालेल्या दंगली. मुंबईकरांसाठी हा काळ अत्यंत दहशतीचा आणि भीतीदायक होता. मुंबईतील मुस्लिम बहुल परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करू लागलेत बेस्ट आणि पोलिसांवरही त्यावेळी राग काढण्यात आला. यामध्ये ९०० जणांचा जीव गेला.

१३ ठिकाणी १३ मोठे धमाके 

त्या काळात मुंबईत अंडरवर्ल्ड सक्रिय होतं. बाबरी मशीद पाडल्याने त्याचा बदला घेण्यासाठी दाऊद इब्राहीमने विडा उचलला असं बोललं जातं. दाऊदने टायगर मेमनच्या साहाय्याने मुंबईत घातपात करण्याच्या मोठा कट आखला. या कटासाठी रायगडमार्गे बंदुका आणि RDX देखील आणण्यात आलं. डिसेंबर १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडण्यात आली  आणि मार्च, १९९३ मध्ये मुंबई साखळी बॉम्ब ब्लास्टने हादरली. मुंबईमध्ये तब्बल १३ ठिकाणी १३ मोठे धमाके केले गेलेत. यामध्येही अनेक मुंबईकरांना आपले प्राण गमवावे लागलेत. 

demolition of babri masjid and its effect on mumbais social life read full article

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT