भागभांडवलात भरीव वाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय sakal
मुंबई

‘सामाजिक न्याय’च्या महामंडळांना बूस्टर!

भागभांडवलात भरीव वाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या अखत्यारीत असलेल्या महामंडळांच्या भाग भांडवलात मोठी वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची भागभांडवल मर्यादा पूर्वी ५०० कोटी होती, ती वाढवून १००० कोटी करण्यात आली आहे. त्याचबरोबर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या भागभांडवलाची मर्यादा ३०० कोटींवरून १००० कोटी करण्यात आली आहे, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाची मर्यादा पूर्वी ७३.२१ कोटी कोटी, ती देखील वाढवून १००० कोटी करण्यात आली; तसेच महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाची भागभांडवल मर्यादा ५० कोटींवरून ५०० कोटी करण्यात आली आहे.

या चारही महामंडळांचे भागभांडवल मोठ्या प्रमाणात वाढविल्याने अनुसूचित जातीतील घटकांसह या महामंडळांच्या लाभार्थी घटकांना कर्ज वाटप, रोजगार व स्वयं रोजगारांच्या वाढीव संधी, दीर्घ मुदत कर्ज योजना, कौशल्य विकासाच्या विविध योजना राबविण्यात येऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यात मोठा हातभार लागणार असल्याचे सामाजिकन्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

उपसमितीच्या शिफारशी स्वीकारल्या

विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग समाजाच्या आरक्षण व आतापर्यंत शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या सवलतींचा अभ्यास करून सादर करण्यात आलेल्या शिफारशी आज राज्य मंत्रिमंडळाने स्वीकारल्या. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

मंत्री छगन भुजबळ, डॉ. जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार, संजय राठोड, गुलाबराव पाटील या सदस्यांची एक समिती १६ ऑक्टोबर २०२० रोजी नेमली होती. या समितीने विविध संवर्गातील या समाजाची रिक्त पदे वर्षोनुवर्षे भरली जात नसल्याची खंत व्यक्त केली होती. तसेच महाज्योती या स्वायत्त संस्थेला निधी वाढवून देणे, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, वसतिगृहे सुरु करणे अशा स्वरुपाच्या विविध शिफारशी केल्या होत्या.त्यावर मंत्रिमंडळाने सखोल चर्चा करून या समितीच्या शिफारशी मान्य करण्यास मान्यता दिली. त्यानुसारच आज सामाजिक न्याय विभागाच्या विविध महामंडळांना भरघोस निधीची वाढ देण्यात आल्याचे सांगण्यात येते.

असे असेल भागभांडवल

महात्मा फुले मागासवर्ग महामंडळ ः १००० कोटी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ ः १००० कोटी

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ ः १००० कोटी

दिव्यांग वित्त व विकास महामंडळ ः ५०० कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shocking : विमान कोसळले! दिग्गज खेळाडूसह कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू, पाच वर्षांचा मुलगा अन् १४ वर्षांची मुलगी आगीच्या तांडवात सापडले

...तर मराठा समाज राष्ट्रवादीला नेस्तनाबूत करेल: राज्य समन्वयक महेश डोंगरे; धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावरून ‘मराठा क्रांती’चा इशारा

Ichalkaranji Politics : इचलकरंजी महाविकास आघाडीत भूकंप! आमदार राहुल आवाडेंनी सतेज पाटलांच्या पदाधिकाऱ्याला लावलं गळाला

Chinese GPS Tracker : कदंबा नौदल तळाजवळ आढळला चिनी GPS लावलेला समुद्री पक्षी; संशोधन की गुप्तहेरगिरी? संशय बळावला

Ind VS Sa 5th t20: विजयी शिक्क्यासाठी आजची लढत; आफ्रिकेविरुद्ध मालिका खिशात टाकण्याची भारताची संधी

SCROLL FOR NEXT