मुंबई

उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त; ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

तुषार सोनवणे

मुंबई  - उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज ब्रीच कँडी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. दरम्यान त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले गेले. खासदार सुप्रिया सुळे यांनीच समाजमाध्यमावर या बाबत माहिती दिली आहे. 

सुरवातीला तापाचे निदान झाल्यानंतर अजित पवार यांनी तपासणी केली होती, ती निगेटीव्ह आली होती, त्या नंतर पुन्हा दुस-यांदा जेव्हा त्यांची चाचणी करण्यात आली, तेव्हा ते कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे लक्षात आले. त्या नंतर स्वताः पवार यांनीच या बाबत समाजमाध्यमावर माहिती दिली व आपल्या संपर्कातील लोकांनीही काळजी घेण्याचे आवाहन केले होते.  खबरदारीचा उपाय म्हणून अजित पवार हे ब्रीच कँडीमध्ये दाखल झाले होते. त्या नंतर त्यांनी आराम केला. आज मात्र त्यांची प्रकृती उत्तम असल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. 

दरम्यान अजित पवार पुन्हा दौरे केव्हा सुरु करणार हे अद्याप निश्चित नाही. काही दिवस ते घरी थांबूनच काम करतील, असे निकटवर्तियांकडून सांगितले गेले. उपमुख्यमंत्री कार्यालयाकडूनही अद्याप कोणतेही दौरे निश्चित झालेले नसल्याचे सांगितले गेले. 

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्य पाहणी दौ-यांनतर अजित पवार यांची टेस्ट निगेटीव्ह आली होती, पण नंतरच्या चाचणीत मात्र ते पॉझिटीव्ह आढळले होते. त्यांनी आपणहूनच काळजी घेण्याचे निश्चित करुन रुग्णालयात दाखल होणे पसंत केले. डॉक्टरांनीही त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. 

कोरोनाचे संकट सुरु झाल्यापासून अजित पवार कमालीचे व्यग्र होते, मुंबई, पुणे, बारामतीसह त्यांनी राज्याच्या विविध भागात फिरून कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला कामाला लावले होते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासमवेत त्यांनी कोरोनाची स्थिती नियंत्रित करण्यासाठी यंत्रणेसोबत समन्वय ठेवत काम केले.  लवकरच अजित पवार आपले दैनंदिन कामकाज सुरु करतील, असेही सूत्रांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

Truck Accident : धारूर घाटात सरकी वाहतूक करणारा ट्रक पलटी; चालक दरीत कोसळला, प्रवासी व वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण

Sugar Rate : साखरेच्या दराची कृत्रिम सूज ओसरली! 1500 रुपये प्रतीक्विंटलची घट; साखरेला स्थर्य मिळण्याची शक्यता

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

SCROLL FOR NEXT