मुंबई

वसुलीचे आदेश देशमुखांनी दिले नाहीत;वाझेचा चांदीवाल आयोगापुढे जबाब

देशमुख यांचे वकील ॲड. गिरीश कुलकर्णी यांनी त्याची उलटतपासणी घेतली.

सकाळ वृत्तसेवा

देशमुख यांचे वकील ॲड. गिरीश कुलकर्णी यांनी त्याची उलटतपासणी घेतली.

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी मला कुठल्याही हॉटेल किंवा बारमालकाकडून खंडणी वसूल करण्यास सांगितले नव्हते, असा जबाब बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याने आज (ता. १४) चांदीवाल आयोगापुढे दिला.

खंडणी वसुलीच्या प्रकरणात आज बडतर्फ पोलिस निरीक्षक अधिकारी सचिन वाझे याला मंगळवारी निवृत्त न्यायाधीश के. यू. चांदीवाल यांच्या आयोगापुढे हजर करण्यात आले. यावेळी वाझे याने माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप फेटाळले.

देशमुख यांचे वकील ॲड. गिरीश कुलकर्णी यांनी त्याची उलटतपासणी घेतली. देशमुख आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मला कधीही खंडणी वसूल करण्याबाबत सांगितले नाही. शहरातील कोणत्याही बार मालकांकडून किंवा त्यांच्या संबंधित लोकांकडून मी पैसे घेतले नाहीत, अशी कबुली त्याने दिली. मी करत असलेल्या तपासात गृह मंत्रालय किंवा कोणत्याही राजकीय व्यक्तीने हस्तक्षेप केला नाही आणि पैशाची ऑफरही दिली नाही, अशी माहिती वाझेने जबाबात दिली. या प्रकरणावरील पुढील सुनावणी २१ डिसेंबरला होणार आहे.

देशमुख २७ पर्यंत न्यायालयीन कोठडीत

माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी केलेल्या शंभर कोटी रुपयांच्या खंडणीवसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना २७ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश आज विशेष न्यायालयाने दिले. परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या खंडणीचे आरोप केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात? आता काही केलं तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सवाल, CSK चं काय?

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

SCROLL FOR NEXT