Devendra Fadnavis nephew Tanmay Fadanvis Corona Vaccine Twitter
मुंबई

फडणवीसांच्या पुतण्याला लस मिळतेच कशी?, काँग्रेसचा सवाल

देवेंद्र फडणवीस यांच्या २३ वर्षीय पुतण्यानं लस घेतल्यानं आता चांगलंच राजकारण तापलं आहे.

पूजा विचारे

मुंबई: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या २३ वर्षीय पुतण्यानं लस घेतल्यानं आता चांगलंच राजकारण तापलं आहे. येत्या १ मे रोजीपासून केंद्र सरकारनं देशातील १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस घेण्याची मुभा दिली आहे. मात्र फडणवीस यांचा पुतणा तन्मय फडणवीस यांनी आधीच लस घेतल्यानं काँग्रेसनं फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. एकीकडे रेमडेसिवीरच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं आहे. त्यातच आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेसनं या मुद्द्यावरुन हल्लाबोल चढवला आहे.

काय म्हटलं काँग्रेसनं

महाराष्ट्र काँग्रेसनं आपल्या ट्विटर हॅडलवरुन ट्विट करुन ही टीका केली आहे. “४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातली आहे. असं असताना फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी? भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय कीडे मुंग्या आहेत का? त्यांच्या जीवाची काहीच किंमत नाही का!” असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केला आहे.

तसंच तन्मय फडणवीस ४५ वर्षांपेक्षा मोठा आहे का? फ्रंटलाईन वर्कर आहे का? आरोग्य कर्मचारी आहे का? भाजपकडे रेमडेसिवीरप्रमाणे लसींचाही गुप्त साठा आहे का?” असे प्रश्नही काँग्रेसने उपस्थित केलेत.

https://twitter.com/INCMaharashtra/status/1384156032595685376?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1384156032595685376%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Fpolitics%2Fdevendra-fadnavis-young-nephew-tanmay-fadanvis-gets-corona-vaccine-social-media-ask-eligibility-441203.html

देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे तन्मय फडणवीस यांनी लस घेतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. फोटो शेअर करताच ते सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर फडणवीस यांच्यावर सत्ताधाऱ्यांनी टीका करण्यास सुरुवात केली.

https://twitter.com/Cryptic_Miind/status/1384140451855278095?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1384140451855278095%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Fpolitics%2Fdevendra-fadnavis-young-nephew-tanmay-fadanvis-gets-corona-vaccine-social-media-ask-eligibility-441203.html

समोर आलेल्या माहितीनुसार, तन्मय यांनी पहिली लस ही मुंबईतर तर लस घेतानाचा जो दुसरा फोटो व्हायरल झाला तो नागपुरातला आहे. तन्मय हा पेशानं इंजिनिअर आहे. तसंच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतणा तर माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे नातू आहे. नागपुरातील पब्लिक फिगर असे इन्स्टाग्राम बायोमध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagaradhyaksha Election Poll Results : नगराध्यपदाच्या निकालानंतर अजित पवार गटाच्या नेत्याने टोचले स्वत:च्या पक्षाचे कान; म्हणाले, आत्मचिंतनाची गरज!

Umarga Municipal Result:'शिवसेनेच्या किरण गायकवाडांचा दणदणीत विजय'; उमरगा नगरपालिकेसठी चुरशीच्या लढतीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव..

Nagpur Nagaradhyaksha Results 2025 : मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये कुणी मारली बाजी? कोणत्या पक्षाचे किती नगराध्यक्ष? वाचा संपूर्ण यादी

Crime: धक्कादायक! अनेक तरुणींसोबत तब्बल लग्नाची रात्र ५५ वेळा साजरी; वधूसोबत नको ते कृत्य, एका वराची हादरवणारी कथा

Vijay Hazare Trophy: ऋतुराज गायकवाड कर्णधार, पृथ्वी शॉही महाराष्ट्र संघात; पहिल्याच सामन्यात शुभमन-अभिषेकच्या संघाला भिडणार

SCROLL FOR NEXT