मुंबई

'अहंकारी सरकार जगाच्या पाठीवर कुठेही चालत नाही'; अधिवेशनाआधी देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद

तुषार सोनवणे

मुंबई - राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबई येथे होत आहे. सोमवारी आणि मंगळवारी हे दोनच दिवस अधिवेशन होणार आहे. परंतु या अधिवेशनाआधी होणाऱ्या चहापाण्याच्या कार्यक्रमावर भारतीय जनता पक्षाने बहिष्कार टाकला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चहापाण्याच्या कार्यक्रमाआधी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकासआघाडीच्या धोरणांवर आणि निर्णयांवर टीका केली. हिवाळी अधिवेशनाआधी फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. त्यामुळे अधिवेशनात विरोधी पक्ष भाजप आक्रमक असल्याची चुणूक दिसली आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे

अधिवेशन फक्त दोन दिवसांचे ठेवण्यात आले आहे. त्यातही एक दिवस शोक प्रस्ताव होणार आहे. म्हणजेच एकच दिवसाचे हे अधिवेशन असणार आहे.

- एका दिवसातील 4-5 तासात पुरवणी मागण्या आटोपून टाकण्याचा सरकारचा खटाटोप

- हे अधिवेशनही किमान दोन आठवड्यांचे होणे अपेक्षित

- आपल्या गैरकारभारावर, चुकलेल्या धोरणांवर चर्चा होणे सरकारला नकोय. सरकार चर्चेपासून पळ काढतंय

- समाजातील कोणत्याही घटकाला प्रतिसाद न देणाऱ्या सरकारच्या चहापानाला आम्ही बहिष्कार घालत आहेत

- राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. पावसाचामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

- शेतकऱ्यांना कवडीचीही मदत मिळालेली नाही. सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली.

- देशात कोरोनाचे सर्वात जास्त बळी महाराष्ट्रात. कोरोना काळात राज्यात मोठा भ्र्ष्ट्राचार झाला आहे. 

- संपूर्ण देशात कोरोना संसर्ग कमी झाला असताना, राज्यात त्या तुलनेने अजूनही मृत्यू दर अधिक

- राज्यात महिलांवर होणारे अन्याय वाढले आहे. शक्ती कायद्याबद्दल सरकारने अधिवेशनात सविस्तर चर्चा करावी. 

- राज्यातील कोविड सेंटर्समध्ये सुरक्षा रक्षक असूनही बलात्कार झाले आहेत. गुन्हेगारांवर कायद्याचा वचक राहिलेला नसून, राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत.

- महाविकास आघाडी सरकारमुळे राज्यातील सामाजिक सलोख्याची घडी विस्कटत असल्याचे चित्र आहे. सरकारने मराठा आरक्षण गांभीर्याने न घेतल्याने, सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली आहे. सरकारने समाजाला जाणीवपूर्वक आरक्षणापासून दूर ठेवले आहे.

- मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही. 

- वीज देयकांबाबतही सरकारने घुमजाव केले आहे. ग्राहकांना लॉकडाऊन काळातील बीलांमध्ये सवलत देणार असे सरकारने म्हटले होते.

- मुंबई मेट्रोचे कारशेड कांजुरमार्गला हलवण्यामुळे मुंबईकरांचे मोठे नुकसान होणार आहे.

-राज्यात सध्या अघोषित आणिबाणी सुरू आहे. पत्रकार आणि सर्वसामान्यांनी सरकार विरोधात बोलल्यास तुरूंगाचा रस्ता दाखवला जात आहे.

-  सरकारचे निर्णय तुघलकी आणि एकांगी आहे. त्यामुळे चहापाण्यावर बहिष्कार टाकरणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Train food vendor beat passenger Video : ‘’जेवण फार महाग आहे’’, एवढंच म्हटलं तर प्रवाशाला रेल्वेतच विक्रेत्यांनी पट्टा काढून बेदम मारलं!

Rafiq Sheikh: रविंद्र धंगेकराच्या आरोपांवर थेट प्रत्युत्तर; रफिक शेख कोण? संपूर्ण माहिती आली समोर

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने सर जे. जे. समूह रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना नोटीस बजावली

Maharashtra Fisheries : पर्ससीन, एलईडी मासेमारीची एसआयटीमार्फत चौकशी करा; पारंपरिक मच्छिमार संरक्षण समितीची मागणी!

Pune News : महापालिकेने केली इमारत पाडकामासाठी नियमावली

SCROLL FOR NEXT