Devendra Fadnavis
Devendra Fadnavis 
मुंबई

दोन दिवसांचे अधिवेशन मान्य नाही- देवेंद्र फडणवीस

विराज भागवत
  • लोकशाही बासनात गुंडाळून ठेवण्याची या सरकारची कार्यपद्धती असल्याची टीका

  • Business Advisory Committee मधून भाजपचं बहिर्गमन

मुंबई: "कोरोनाचा आजार अत्यंत गंभीर आहे यात दुमत नाही. पण कोरोनाचा बहाणा पुढे करून राज्याचे अधिवेशनच होऊ नये, अशा प्रकारचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. एकीकडे सरकारमधील एका पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला कितीही लोकं गेलेली चालतात, राज्यातील बारमध्ये कितीही लोक जाऊन बसलेली चालता... पण राज्याच्या विधीमंडळात कोरोनाच्या भीतीने अधिवेशन घ्यायचे नाही, अशी मानसिकता या सरकारची आहे. केवळ २ दिवसांचे अधिवेशन घेण्याची सरकारची तयारी आहे, त्यामुळे Business Advisory Committee मधून आम्ही बहिर्गमन केलेलं आहे", अशा शब्दात राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर तोफ डागली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

"एखाद्या राज्याची अशी अवस्था आम्ही संसदीय लोकशाहीमध्ये आतापर्यंत पाहिलेली नाही. सध्या राज्यात खूप प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे, विम्याचे, बोनसचे, बियाण्यांचे अनेक प्रश्न आहेत. वीज पुरवठ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर होत चालला आहे. राज्यातील जनता नैराश्याकडे चालली आहे. कायदा सुव्यवस्थेचा थांगपत्ता नाही. महत्त्वाचे म्हणजे, आरक्षणाच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन घ्यावं अशी मागणी होत असताना, आहे ते अधिवेशनच छोटं करून चर्चेला जागाच द्यायची नाही, असं राज्य सरकार करत आहे. या सरकारकडे लोकशाही बासनात गुंडाळून ठेवण्याची एक नवीन पद्धत दिसत आहे", असा टोला त्यांनी लगावला.

"सध्या विधीमंडळाचं अध्यक्षपद रिक्त आहे. आम्ही बैठकीदरम्यान नियम वाचून दाखवला की अध्यक्षपद रिक्त झाल्यावर राज्यपालांच्या पत्रानुसार लगेच निवडणूक घेऊन नवा अध्यक्ष निवडणे आवश्यक असते. पण त्याबद्दलची निवडणूक अद्याप झालेली नाही. राज्याच्या इतिहासात ही खूपच गंभीर बाब आहे. संविधानाने तयार केलेले नियम पाळायचेच नाही, अशी सध्याच्या सरकारची परिस्थिती आहे. दोन दिवसाचे अधिवेशन म्हणजे सामान्य माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याची बाब आहे", असं टीकास्त्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सोडलं.

अनिर्बंध प्रशासन आणि मदमस्त झालेले मंत्री यांच्या जीवावर सध्या महाराष्ट्र चालवला जात असून विरोधकांनी या गोष्टींबद्दल प्रश्न विचारू नये यासाठी अधिवेशन कमी कालावधीचं केलं जातंय. जनतेच्या प्रश्नांबद्दल आम्ही अधिवेशनातही जाब विचारू आणि नंतर जनतेमध्ये जाऊनदेखील जाब विचारू", असेही फडणवीस म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT