Devendra Fadnavis esakal
मुंबई

आता लक्ष्य मुंबई! प्रदेश कार्यालयासमोरच फडणवीसांचा एल्गार

सकाळ डिजिटल टीम

देशातील चार निवडणुकांच्या निकालानंतर भाजपने अन्य निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. २०१७ साली सत्तेत आल्यानंतर भाजपला त्यांनी जिंकलेल्या चारही राज्यात पुन्हा सत्ता प्रस्थापित करण्यात यश आलंय. गोव्यातील एकहाती विजय आणि उत्तर प्रदेशात मोदींसह योगींचा करिष्मा भाजपचं स्थानिक पातळीवर बळ वाढवणारा आहे. (Devendra Fadnavis )

यानंतर देवेंद्र फडणवीसांचं नाव सर्वात चर्चेत आलंय. फडणवीस गोव्याचे प्रभारी झाल्यानंतर भाजपला सत्ता मिळाली. याआधी त्यांच्यावर बिहारची जबाबदारी देण्यात आली होती. फडणविसांनी ती देखील पार पाडली, आणि नितीशकुमार यांना मुख्यमंत्री करत भाजप पुन्हा सत्तेत आली.

गोव्यात सत्ता स्थापनेची सोय लावून देवेंद्र फडणीवस आज मुंबईत परतले. याआधीच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांपासून भाजपच्या बड्या नेत्यांची फौज फडणवीसांच्या स्वागतासाठी तयार होती. मुंबईच्या प्रदेश कार्यालयासमोर भाजपने जल्लोष केला.

उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, मणिपूर या राज्यांच्या निकालानंतर मोदीजींची जादू आपण पाहिलीच, त्यामुळं मोदी है तो मुमकिन है! निवडणुकीत दुसऱ्या सेनेचं शिवसेना काय झालं? आपण तेही पाहिलं आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मतदार संघात जाऊन शिवसेनेनं आवाहन दिलं होतं. पण, तिथं शिवसेनेला फक्त ९७ मतं मिळाली आहेत. ही भाजपची ताकद आहे, असं फडणवीस म्हणाले.

आता मिशन मुंबई... फडणवीसांचा एल्गार

आता लढत मुंबईत होणार आहे, महापालिका निवडणुकीची लढत... आम्ही कोणत्याही पक्षाविरोधात नाही, आम्ही लाचखोरी आणि भ्रष्टाचाराविरोधात आहोत... उत्तर प्रदेश फक्त झांकी आहे, महाराष्ट्र अजून यायचा आहे, असं फडणवीस यांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Krishnaraj Mahadik Statement : शक्तिपीठ महामार्गावरून शेतकऱ्यांची दिशाभूल; भाजप प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिकांचा राजू शेट्टी, सतेज पाटलांवर निशाणा

Nagpur News: एनएचएआयकडून वीज वाहिनीचे नुकसान ;२२ हजार नागरिक उकाड्याने त्रस्‍त

CRPF Constable Recruitment 2026 Last Date : कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज करण्याची आज अंतिम तारीख, ९१९५ सरकारी नोकऱ्यांसाठी असा करा अर्ज

अर्रर्रर्र खतरनाक! 'देवमाणूस' मध्ये मोठा ट्विस्ट; गोपाळला वठणीवर आणायला 'ती' येतेय; कोण आहे ती? नेटकऱ्यांनी ओळखलं...

Mumbai Indians ला शेवटच्या सामन्याआधी मोठा धक्का! शतकवीर खेळाडूसह युवा ऑलराऊंडर IPL 2026 मधून बाहेर

SCROLL FOR NEXT