Aditya Thackeray_Devendra Fadnavis 
मुंबई

Mumbai : "मुंबई म्हणजे मलई असं फडणवीसांना वाटतंय"; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

फडणवीसांनी मुंबईतील दहिहंडी उत्सवात राजकीय भाष्य केलं होतं. त्याला आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई म्हणजे मलाई आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाटतय, अशा शब्दांत आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. फडणवीसांनी मुंबईतील भाजपच्या दहिहिंडीवेळी उपस्थितांना शुभेच्छा देताना केलेल्या विधानावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. (Devendra Fadnavis thinks Mumbai is Malai Aditya Thackeray slams)

आदित्य ठाकरे म्हणाले, मला वाटतं त्यांना मुंबई म्हणजे मलाई असं काहीतरी वाटत असेल. आज कुठेही राजकीय बोलणं योग्य नाही. कोविडचा काळ निघून गेलेला आहे, लोक आता पूर्वीसारखा सण एन्जॉय करत आहेत, त्यामुळं या सणामध्ये कुणी राजकारण आणता कामा नये.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील टेंभी नाक्याच्या दहिहंडी उत्सवात बोलताना केलेल्या विधानालाही आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, त्यांना थर लावावे लागले की खोके? आणि दुसर म्हणजे त्यावेळी मलाई एकाच माणसाला मिळाली. तसेच आमचे जे लोक त्यांच्यासोबत निष्ठावंत म्हणून गेले त्यांची निष्ठा कुठे गेली. त्यांचा देखील विश्वासघात झालेला आहे.

काय म्हणाले होते शिंदे आणि फडणवीस?

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की, मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची दहीहंडी आम्ही फोडत आहोत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की, दीड महिन्यांपूर्वी त्यांनी एक दहिहंडी फोडली यासाठी त्यांना ५० थर लावावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT