मुंबई

देवेंद्र फडणवीस दुर्दैवी गृहमंत्री; वाचा कोणी म्हणलं..

सकाळ वृत्तसेवा

पाली : युवती व महिलांच्या संरक्षणासाठी माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांनी सुरू केलेल्या महिला दक्षता कमिट्या भाजपने बंद केल्या. परिणामी मागील पाच वर्षांत महिलांवरील अन्याय, अत्याचाराच्या घटनांत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. त्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे दुर्दैवी गृहमंत्री ठरले असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केला.

कोकण दौऱ्यादरम्यान सोमवारी (ता.27) पालीत त्या बोलत होत्या. या वेळी महिला व युवती कार्यकर्त्यांची भेट घेऊन पक्षवाढीसंदर्भात मार्गदर्शन केले. या वेळी पेण, सुधागड, रोहा मतदारसंघाच्या अध्यक्षा गीता पालरेचा, माजी सभापती साक्षी दिघे, रमेश साळुंके, अभिजित चांदोरकर, साधूराम साजेकर, किरण खंडागळे, संदेश शेवाळे, सुलतान बेणसेकर, सखाराम दिघे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

हे देखिल वाचा ः चित्रपटांतील गांधीवाद
चाकणकर म्हणाल्या, गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन भाजप सरकारने बंद केलेल्या महिला दक्षता कमिट्या पुन्हा कार्यरत केल्या जाणार आहेत. या कमिट्यांच्या माध्यमातून महिला सुरक्षा, धैर्य व आत्मविश्वास देण्याचे काम केले जाणार आहे. युवती व महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिलांसमवेत स्थानिक बीट मार्शल, दामिनी पथक, पोलिस स्थानक यांच्या माध्यमातून स्थानिक प्रभाग, पंचायत समिती, जिल्हा परिषद व ग्रामपंचायतनिहाय महिलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणारी यंत्रणा येत्या काळात उभी करणार आहोत. 

नागरिकांच्या हितासाठी लढा देऊ 
सामूहिक बलात्काराच्या घटनांतील पीडित महिलांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांना आधार, आत्मबळ व सन्मान देण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. महिला सुरक्षित झाल्यास त्यांच्यातील आत्मविश्वास वाढेल, त्या ताकदीने काम करतील व यातूनच उद्याचा सक्षम व समृद्ध राष्ट्र घडेल, असे चाकणकर म्हणाल्या. एनसीआर, एनपीआर व सीएएच्या संदर्भात चाकणकर म्हणाल्या, की आम्ही सारे भारतीय आहोत. त्यामुळे येथील नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी व हितासाठी आम्ही सतत लढा देत राहू. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : मध्यरात्री भरधाव ट्रकची कारला भीषण धडक; पुण्यात बाप-लेकीसह मेहुण्याचा जागीच अंत, 'ती' भेट ठरली अखेरची...

SBI Clerk Result 2026: SBI क्लर्क मुख्य परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार; 'या' संकेतस्थळावर पाहा रिजल्ट

Supe Baramati History : बारामतीच्या इतिहासात नवी भर! सिद्धेश्वर मंदिराच्या बांधकामाचे 300 वर्षांपूर्वीचे शिलालेख उघड, मराठा काळातील संस्कृतीचे दर्शन

Maharashtra Revenue Department : महसूल विभागातील सर्व सेवा नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने मिळणार

Live-in Partner vs Dowry Law: पत्नी नाही, तरी गुन्हा? लिव्ह-इन पार्टनरलाही हुंडा कायद्याचा हक्क? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला थेट सवाल

SCROLL FOR NEXT