Dharavi sakal media
मुंबई

धारावीने करुन दाखवलं ; चौथ्यांदा कोरोनाच्या शून्य रुग्णांची नोंद

भाग्यश्री भुवड

मुंबई : जुन महिन्यात पहिल्यांदा शून्यावर आल्यानंतर आता चौथ्यांदा धारावीत (dharavi corona) शून्य रुग्णांची नोंद (zero corona patient) झाली आहे. दुसऱ्या लाटेमध्ये (second wave) धारावीत शून्य रुग्णांची नोंद होण्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी 14 जून ,17 जुलै आणि 3 ऑगस्ट रोजी धारावी मध्ये शून्य रुग्णांची(corona free dharavi) नोंद झाली होती. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असतांना धारावीमध्ये शून्य नोंद झाल्याने धारावीकरांची चिंता काहीशी कमी झाली आहे. मात्र, धारावीतील सक्रिय रुग्णांची (active patient) संख्या वाढती आहे.

मंगळवारी धारावीत शून्य रुग्णांची नोंद झाली. धारावीतील कोरोना परिस्थिती नियंत्रणात त्या तुलनेत दादर आणि माहीम मधील सक्रिय रुग्णांची संख्या मात्र कमी झाली आहे. धारावीमध्ये 8 जुलै ला 21 सक्रिय रुग्ण होते. त्यात वाढ झाली असून 35 झाली आहे. दादर मधील सक्रिय रुग्ण मात्र 126 वरून कमी होऊन 100 झाले तर माहीम मधील सक्रिय रुग्णांची संख्या ही 73 वरून कमी होऊन 71 झाली आहे.

धारावी मध्ये शनिवारी एक ही पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही. माहिम मध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 10 हजारांवर पोहोचली आहे. माहिममध्ये शनिवारी 4 रुग्ण, दादरमध्ये 2 आणि धारावीत शून्य रुग्ण नोंदवले गेले. तर, जी उत्तर मध्ये आज 06 रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 27,165 झाली आहे. तर, एकूण 206 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये 22 ,26  27 और 31 जनवरी ,2 फेब्रुवारी, 14 जून आणि 17 जुलै ला शून्य रुग्णांची नोंद झाली होती. तर दुसऱ्या लाटेमध्ये सुरुवातीला धारावीत पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढली होती. 8 एप्रिल रोजी धारावीमध्ये दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक 99 रुग्ण सापडले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat : 'कॅप्टन' खरातचे सिन्नरमध्ये मालमत्तांचे जाळे; पत्नीच्या नावावर कोट्यवधींचे भूखंड, तपासात नवी माहिती समोर

"दागिन्यांच्या जाहिरातीत माझ्यासारख्या मुलीला.." प्रियदर्शिनीच्या बहिणीची रवी जाधव यांच्यासाठी भावूक पोस्ट

Raj Thackeray: संतांची भूमी आणि भोंदूंचा उच्छाद; अशोक खरातसारख्या नीचला राजकीय आश्रय? पोस्टमधून राज ठाकरेंचा संताप, काय म्हणाले?

अल्पवयीन मुलींना गर्भपातास परवानगी, पण बाळाला जन्म दिल्यास काय होणार? सरकारने दिली महत्त्वाची माहिती

Why Acidity Suddenly Increases : उन्हाने पोट दुखतं, पित्ताशयात खडे तर नाहीत ना? ॲसिडिटीचाही होतोय त्रास? कडक उन्हाळ्यात अनेकांना आरोग्याच्या समस्या

SCROLL FOR NEXT