Dharavi Masjid ESakal
मुंबई

Dharavi: 5 हजार जणांचा जमाव; भडकाऊ पोस्ट व्हायरल अन् गर्दीत बाहेरचे लोक, धारावी मशीद प्रकरणी पोलिसांचा मोठा खुलासा

Dharavi Masjid Case: धारावी मशीद प्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

Vrushal Karmarkar

मुंबईतील धारावी येथील मशिदीतील कथित बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी बीएमसीची टीम शनिवारी सकाळी दाखल झाली. पथक येताच मोठा जमाव जमला. त्यांच्या वाहनावरही हल्ला करून त्याची काच फोडण्यात आली. लोक बीएमसीच्या कारवाईचा निषेध करत होते. याप्रकरणी आता मोठा खुलासा झाला आहे.

मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे की धारावी पोलीस स्टेशनपर्यंत सुमारे 5 हजार लोकांचा जमाव जमला होता. या गर्दीत अनेक बाहेरचे लोकही होते. धारावी बाहेरून आलेल्या या लोकांची पोलीस ओळख पटवत आहेत. बीएमसीच्या तोडफोडीच्या कारवाईच्या विरोधात जमाव जमवण्यासाठी भडकाऊ पोस्ट आणि व्हिडिओ बनवण्यात आल्याचंही तपासात समोर आलं आहे. या पोस्ट आणि व्हिडिओ शुक्रवारी रात्रीपासून व्हायरल होऊ लागले. पोलिसांनी या भडकाऊ पोस्ट्स आणि व्हिडिओंची ओळख पटवली असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

धारावी पोलिसांनी बेकायदेशीरपणे जमाव जमवणे आणि BMC वाहनाची तोडफोड करणे (सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे) या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. धारावीतील मशीद परिसरात सकाळी मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे वाहनांची वाहतूक विस्कळीत झाली होती. आंदोलक रस्त्यावर बसले. यानंतर पोलिसांचे पथक आले आणि त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. वाहने जाऊ शकतील यासाठी त्यांना बाजूला करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यांची समजूत काढण्यासाठी स्थानिक लोकही पुढे आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Gupta : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जीवघेणा हल्ला, जनता दरबार सुरु असताना हल्लेखोर आला अन्...

Satara Rain update:'कराड-पाटण तालुक्यात मुसळधार; कराड-चिपळूण मार्ग वाहतूक बंद, अडकलेले कोकणात जाणारे 150 प्रवासी एसटी बसमधून रवाना

HDFC Bank Alert: HDFC ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बँकेच्या अत्यावश्यक सेवा दोन दिवस बंद राहणार

Dhanashree Verama: युझवेंद्र चहलच्या 'Sugar Daddy' टी शर्टवर धनश्रीची जोरदार टीका; म्हणाली, मी कोर्टात रडले आणि तो...

Pune Rain Update: पुण्यात पावसाचा हाहाकार! एकता नगरमध्ये पाणी शिरलं, खडकवासल्यातून विसर्ग वाढला

SCROLL FOR NEXT