Sanjay Raut esakal
मुंबई

Sanjay Raut: 'धर्मवीर २' विरुद्ध 'नमक हराम २'! लवकरच चित्रपट काढणार; संजय राऊतांचा प्रतिहल्ला

'धर्मवीर २' या सिनेमावर भाष्य करताना संजय राऊत यांनी हे भाष्य केलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा आज ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये पार पडला. यावेळी संजय राऊत यांनी शिंदे गटातील नेत्यांवर घणाघात केला. तसंच लवकरच मी 'नमक हराम-२' हा सिनेमा काढणार असल्याचं ते म्हणाले.

संजय राऊत म्हणाले, सध्या ठाण्यातील लोक फार सिनेमा काढत आहेत. ते मुख्यमंत्री आहेत की फिल्म प्रोड्युसर झालेत. मी बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा काढला आहे, त्यात मी सत्य सांगितलं आहे. पण मला एक सिनेमा काढायचा आहे. नमक हराम २ माझ्याकडं याची स्क्रीप्ट तयार आहे. मी चांगला लेखक आहे, मी संपादक आहे. राजकारण माझ्या समोर घडतं. बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं की राजकारण आपण घडवायचं आणि बिघडवायचं.

त्यामुळं लवकरच मी नमक हराम २ हा सिनेमा काढणार आहे. यामध्ये ठाण्यातील सर्व हरामखोरांवर प्रकाश टाकणार आहे. ठाण्याचं नाव या गद्दारांनी आणि गब्बरांनी पूर्ण मातीत मिळवलं आहे. या ठाण्याची प्रतिष्ठा त्यांनी धुळीला मिळवलं. या ठाण्यात अनेक महान लोक होऊन गेले. बाळासाहेब ठाकरेंनंतर ठाण्याचं नाव धर्मवीर आनंद दिघेंच्या नावानं ओळखलं जात होतं. ते या गद्दारांनी संपूर्ण देशात बदनाम केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jejuri Temple Incident : जेजुरी गडावर धक्कादायक घटना! भाविकांकडून पुजाऱ्याला मारहाण, नेमकं काय घडलं?

Chhatrapati Sambhajinagar: कृषी पदवीच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशास सुरवात; राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत शिक्षणाची संधी; १२ जूनपर्यंत करता येणार अर्ज

एकेकाळी प्रफुल पटेलांचे PA ते आता राज्यसभेसाठी पक्षाकडून उमेदवारी, कोण आहेत राजेंद्र जैन?

Petrol-Diesel-CNG Price: LPG गॅस दरवाढीनंतर आज पेट्रोल-डिझेल-CNG चे नवे दर जाहीर! आता किती रुपये मोजावे लागणार?

Rahul Gandhi: मोदींना वाटते, युवकांनी भजी तळावीत: राहुल गांधी, सीबीएसई घोटाळा प्रकरण तापले

SCROLL FOR NEXT