ठाण्यात होणार कोरोनावर अनोख संशोधन! महापौरांचे मंजुरीसाठी आयुक्तांना साकडे... 
मुंबई

ठाण्यात होणार कोरोनावर संशोधन! महापौरांचे मंजुरीसाठी आयुक्तांना साकडे...

राजेश मोरे

ठाणे : एखाद्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे किंवा नाही? याची तपासणी करण्याकरिता आवाज व श्‍वसन निदान पद्धती पुढे येत आहे. अशाप्रकारे कोरोना निदान करण्याच्या पद्धतीवर ठाण्यातही संशोधन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे ठाणे पालिकेच्या रुग्णालयात या प्रकल्पावर संशोधन करण्यासाठी आयुक्तांनी मंजुरी द्यावी, अशी सूचना महापौर नरेश म्हस्के यांनी केली आहे. 

ठाण्यातील कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. आशीष भूमकर (भूमकर इएनटी हॉस्पिटल), व्हॉईस थेरपिस्ट व स्पीच लॅग्वेज पॅथॉलॉजिस्ट सोनाली लोहार (वॉईस क्‍लिनिक, ठाणे) व न्यूरोस्पिच लॅग्वेज थेरपिस्ट डॅनिअल जोनास्‌ (हेल्थ को हिअरिंग स्पिच ऍण्ड फिलीओक्‍लोनिक) यांच्या माध्यमातून "ठाणे हेल्थ केअर' या रुग्णालयात आवाज व श्‍वसन पद्धतीचा अवलंब करून कोरोनाची तपासणी करण्याचे संशोधन सुरू केले आहे. 

अशाच प्रकारचे संशोधन प्रकल्प मुंबई महापालिकेत देखील प्रस्तावित आहेत. ज्याद्वारे 1 हजार व्यक्तींची तपासणी करणे शक्‍य होणार आहे. अत्यंत कमी वेळामध्ये ही तपासणी होत असल्यामुळे जास्तीत जास्त संशयित कोरोनाबाधित व्यक्ती शोधून त्यांच्यावर तात्काळ उपचार करणे शक्‍य होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. रुग्णालयातून घरी गेल्यावरही कोरोनाचा रुग्णाच्या फुप्फुसाच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाल्यास या तपासणीच्या माध्यमातून त्याचे लवकरात लवकर निदान करणे शक्‍य होईल व त्यावर लवकर उपचार मिळू शकणार आहेत. 

"या' पद्धतीचे जगभरात संशोधन 
आवाज व श्‍वसन पद्धतीमध्ये कोरोना संशयित सर्वसामान्य व्यक्तींनी घरच्या घरीच आपल्या नियमित आवाज व श्‍वसनामध्ये काही बदल झाल्यास त्याची नोंद स्वत:च्याच मोबाईलमध्ये करावी. रुग्णाने कोणत्याही रुग्णालयात वा प्रयोगशाळेत न जाता केवळ ई-मेलद्वारे व्हॉईस क्‍लिनिकला आवाजातील बदल पाठविल्यास केवळ 20 ते 25 मिनिटात सदर व्यक्तीच्या आवाजाच्या काही पॅरामीटरच्या बदलातून सदर व्यक्तींच्या श्‍वसन संस्थेवर काही परिणाम झाला आहे का? कळू शकते व वेळेत उपचार होऊ शकतात. या संदर्भात सध्या जगभर अभ्यास सुरू आहे. 

आवाजातील बदलाच्या अनुषंगाने कोरोनाचे लवकरात लवकर निदान होण्याबाबत काय उपाययोजना करता येतील, याबाबत डॉ. आशीष भूमकर व सोनाली लोहार यांच्याशी गेले दोन महिने माझी सातत्याने चर्चा चालू असून, त्या मॉडेलवर काम करणे सुरू होते. डॉ. भूमकर व त्यांचे सहकारी यांनी वरील पद्धतीचा अवलंब करून ठाण्यामध्ये हा अभ्यास प्रकल्प सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे त्यांना प्रशासनाने पालिकेच्या रुग्णालयात प्रकल्पासाठी परवानगी देण्याची सूचना केली आहे. 
- नरेश म्हस्के, महापौर, ठाणे. 

-------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT