electric bus sakal media
मुंबई

Mumbai : इलेक्‍ट्रिक बसच्या चार्जिंगमध्ये अडचणी

महावितरणकडून उच्च वीजप्रवाह देण्यात त्रुटी

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : इंधनावरील वाहनांमुळे होणारे वायुप्रदुषण कमी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारतर्फे पर्यावरणपूरक असणाऱ्या इलेक्‍ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. नवी मुंबई महापालिकेनेही शहरात पर्यावरणपूरक वाहतुकीकरिता बॅटरीवर चालणाऱ्या तब्बल १८० इलेक्‍ट्रिक बस खरेदी केल्या आहेत. परंतु या बस चार्जिंग करण्यासाठी बसवण्यात आलेल्या यंत्रणेत महावितरणने उच्च दाबाचा वीज प्रवाह सुरू न केल्यामुळे एनएमएमटीच्या १२० नव्याकोऱ्या बस धूळ खात उभ्या आहेत.

केंद्र सरकारच्या फेम या योजनेअंतर्गत महापालिका आणि शहराच्या मागणीनुसार बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्‍ट्रिक बस सबसिडीसहित दिल्या जात आहेत. शहरातील वायुप्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासोबतच इंधनावर होणारा कोट्यवधींचा खर्च वाचवण्यासाठी महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने या योजनेचा लाभ घेत टप्प्याटप्प्याने १८० बस घेतल्या आहेत.

सद्या रस्त्यावर ३० महापालिकेच्या आणि ३० खासगी ठेकेदाराच्या अशा ६० इलेक्‍ट्रिक बस धावत आहेत. या सर्व बसला इंधनाऐवजी बॅटरी चार्जिंगची गरज असल्याने एनएमएमटीच्या तुर्भे, वाशी रेल्वे स्थानक आणि सीबीडी-बेलापूर येथे चार्जिंग यंत्रणा बसवण्यात आली आहे. एनएमएमटीचे तुर्भे हे केंद्रीय आगार असल्याने आगारात जेबीएम या खासगी कंपनीमार्फत बस चार्जिंग करण्याची व्यवस्था उभारण्यात आली आहे. एकाच वेळेस २५ बस चार्ज होऊ शकतात अशी यंत्रणा बसवण्यात आली आहे. परंतु या यंत्रणेला महावितरणतर्फे फक्त १ एमव्हीए पर्यंतच्या दाबाची वीज जोडणी दिल्याने फक्त तीन ते चार बस चार्ज होत आहेत. उर्वरित चार्जिंग पॉइंट्सला उच्च दाबाचा वीज प्रवाह नसल्याने इतर पॉइंट्स बंद अवस्थेत आहेत.

नोडल एजन्सीची भूमिका महत्त्‍वाची

पर्यावरणाला पूरक ठरलेले इलेक्‍ट्रिक वाहतुकीचे नवे जाळे केंद्र व राज्य सरकारला तयार करायचे आहे. बॅटरीवर चालणारी इलेक्‍ट्रिक वाहनांना चार्ज करण्यासाठी विजेची व्यवस्था असायला हवी. त्याकरिता या योजनेत महत्त्वाचा दुवा म्हणून महावितरणची नोडल एजन्सी म्हणून सरकारने नियुक्ती केली आहे. अशा परिस्थितीत नोडल एजन्सी म्‍हणून महावितरण जेव्हा वीज पुरवठा सुरू करेल तेव्हा प्रत्‍यक्ष सरकारच्या योजनेचे विकेंद्रीकरण होण्यास मदत होईल.

ऐरोली, घणसोली व कोपरखैरणेत बसवणार चार्जिंग स्टेशन

नवी मुंबई महापालिकेच्या एनएमएमटी प्रशासनाला तुर्भे, वाशी आणि सीबीडी-बेलापूर बस डेपोमध्ये बसवण्यात आलेल्या चार्जिंग यंत्रणेनंतर ऐरोली, घणसोली आणि कोपरखैरणे येथेही बस चार्जिंगची यंत्रणा बसवायची आहे. त्याकरिता महापालिकेचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु तुर्भे बस आगारात बसवलेल्या यंत्रणेलाच वीज प्रवाह सुरु करताना तांत्रिक अडचणी येत असल्‍याने इतर बस डेपोला कधी वीज मिळणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT