मुंबई

गृहनिर्माण संस्थांच्या ऑडिटसाठी सहकारी फेडरेशनचे थेट उपमुख्यमंत्र्यांना साकडे

कृष्ण जोशी

मुंबई  : कोरोनाचा फैलाव आणि टाळेबंदीमुळे राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्था अडचणीत सापडलेल्या आहेत. यामुळे वार्षिक सर्वसाधारण सभा आणि लेखापरिक्षण यांची मुदत 30 सप्टेंबरच्यापुढे वाढवून मिळावी, यासाठी मुंबई जिल्हा सहकारी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घातले आहे. ही मुदतवाढ मिळाल्यास तिचा फायदा राज्यातील सव्वा लाख गृहनिर्माण संस्थांना होईल. 

सध्याच्या सहकार कायदा व नियमानुसार गृहनिर्माण संस्थांना 30 सप्टेंबरपर्यंत वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) घेणे आणि त्याहीपूर्वी लेखापरिक्षण (ऑडिट) करणे बंधनकारक आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत या दोन्ही गोष्टी ठरल्यावेळेत पूर्ण करणे हे सर्वांनाच कठीण जाणार आहे. राज्यात सव्वा लाखांच्या आसपास (मुंबईत 40 हजार) सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. त्यांचे पदाधिकारी आणि सदस्यांच्या सोयीसाठी एजीएम व ऑडिट यांना मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली जात होती. त्यासाठी फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेतली. एजीएम व ऑडिटच्या मुदतवाढीसंदर्भात कायद्यानुसार सुयोग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन या वेळी देण्यात आले.

'इकडे आड तिकडे विहीर' स्थिती
इमारतीत मोलकरणी, वाहनचालक, सफाई कामगार, नातलग आदींना प्रवेश द्यावा का? याबाबत सरकारचे वेगवेगळे विभाग वेगवेगळ्या सूचना देत आहे. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे. त्या संदर्भात त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत पोलिस, पालिका अधिकारी व प्रशासन यांच्याबरोबर संयुक्त बैठक बोलावून नियमावली तयार करावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. त्यावर लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन मिळाले. 

मुख्यमंत्री सहायता निधीला दोन लाखांचा धनादेश
कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी फेडरेशनतर्फे दोन लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे. या वेळी फेडरेशनचे सचिव दत्तात्रय वडेर, खजिनदार डॉ. डी. एन. महाजन उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Rain Forecast : ...अखेर मान्सून केरळमध्ये दाखल; विदर्भात पुढील 10-12 दिवस कसं असेल हवामान? यंदा 90 टक्के पावसाचा अंदाज

Lalit Modi: हा कसला मूर्ख खेळ आहे?’ सचिन द्रविडसह दिग्गजांनी २००७ च्या T20 World Cup ला दिला होता नकार, ललित मोदींचा खुलासा..

Numerology : टॉम अँड जेरीसारखे असतात 'या' 3 मुलांकाचे लोक; तुझं-माझं जमेना अन् तुझ्याविना करमेना, शेवटच्या श्वासापर्यंत टिकतं नातं

Chardham Yatra: बद्रीनाथ-केदारनाथ मंदिरासमोर 'छैंया-छैंया' गाण्यावर डान्स! मंदिर समिती अ‍ॅक्शन मोडमध्ये, VIP दर्शनासाठी नवी SOP जाहीर

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या साजिद बेग यांची निवडणुकीतून माघार

SCROLL FOR NEXT