मुंबई

कोकणातील माशांच्या नव्या प्रजातीचा BNHS कडून शोध

मिलिंद तांबे

मुंबई: बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस), मुंबई आणि केरळ विद्यापीठातील फिशरीज अँड ओशन स्टडीज (केयूएफओएस) च्या वैज्ञानिकांनी जैवविविधतेने संपन्न उत्तर भागातून करिश्माई फिलामेंट बार्ब नावाच्या नवीन माशांच्या प्रजातीची उकल केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काजली नदीच्या पर्वतीय प्रवाहामधून या माश्यांचे संशोधन करण्यात आले.

डाकिन्सिया या जाती अंतर्गत वर्गीकरण केलेल्या फिलेमेंट बार्ब हा लहानशा पाण्यातील माशांचा समूह आहे जो द्वीपकल्प भारत आणि श्रीलंका नद्यांमध्ये आढळतो. पश्‍चिम घाटातील कोकण भागात आढळलेल्या या नवीन प्रजातींच्या समावेशा नंतर, फिलामेंट बार्बच्या ज्ञात प्रजातींची संख्या तेरापर्यंत पोहोचली आहे. जगभरातील मत्स्यालय छंदात हे मासे लोकप्रिय असून  व्यापार करण्यास मात्र बंदी आहे. डाकिन्सिआच्या काही प्रजाती छोट्या नद्या आणि प्रदेशांमध्ये स्थानिक मत्स्यपालनास कारणीभूत ठरतात.

आकृतीविज्ञान आणि आनुवंशिक विश्लेषणाचा वापर करून पुरावा गोळा करण्याच्या नवीन संशोधनामुळे महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नद्यांमधून ही नवीन प्रजाती सापडली आहेत. ही प्रजाती शोधणारे उऩ्मेश कटवटे यांच्या आई उत्तरा कटवटे याचा सन्मानार्थ या नवीन प्रजातीचे नाव डॉकिन्सिया उत्तरा असे ठेवण्यात आले आहे. पश्चिम घाटाच्या उत्तर भागा या प्रजातीच्या वितरणाचे प्रतीक असल्याने‘नॉर्दर्न फिलामेंट बार्ब’ या सामान्य नावाने देखील ओळखली जाणार आहे.

जर्मनीच्या सेन्केनबर्ग संग्रहालयातून प्रकाशित झालेल्या ‘वर्टेब्रेट जूलॉजी’या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये डॉकीन्शिया उत्ताराचे वर्णन करणारे वैज्ञानिक पेपर शुक्रवारी प्रकाशित झाले. ही नवीन प्रजाती सध्या केवळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजली, तेरेखोल आणि जगबुडी नद्यांच्या वरच्या प्रदेशांमध्ये ओळखली जाते. बहुतेक प्रजाती सारख्याच दिसत असल्याने ही प्रजाती नेमकी ओळखणे अत्यंत कठीण किंवा अशक्य आहे. 

"नवीन अभ्यासानुसार या नवीन प्रजातींचे निदान वैशिष्ट्ये अधोरेखित केली गेली आहेत.त्यामुळे आपल्याला या मोहक माशांच्या ग्लॅमरस ग्रुपचे खरे वैविध्य समजून घेण्यास मदत होईल" असे बॉम्बे नॅचरल हिस्ट्रीच्या फ्रेशवॉटर रिसर्च युनिटच्या फिश सायंटिस्ट उन्मेष कटवाटे यांनी सांगितले.

“हा नवीन अभ्यास आपल्याला गोड्या पाण्याच्या जैवविविधतेच्या महत्त्वपूर्ण क्षेत्राचे वर्णन करण्यास आणि पश्चिम घाटाच्या गोड्या पाण्याच्या जैवविविधतेसाठी संवर्धनाच्या उपक्रमांना प्राधान्य देण्यास मदत करेल. पश्चिम घाटाच्या उत्तरेकडील भागातील गोड्या पाण्याचे स्रोत वाचवण्याची तातडीची आवश्यकताही या अभ्यासामध्ये ठळकपणे दिसून येते असे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक दीपक आपटे म्हणाले.

पाश्चिमात्य घाटाची नदी व्यवस्था गोड्या पाण्यातील माशांच्या विविधतेचे अपवादात्मक आकर्षण केंद्र आहे आणि बर्‍याच नवीन प्रजातींच्या शोधामुळे स्थानिक जैवविविधतेला बळकटी मिळाली आहे. पश्चिम घाट प्रदेशातील मानवी पायांच्या ठसेमुळे या घाटातील भागातील लोकांचे भविष्य सुरक्षित करण्याचा सर्वांगीण प्रयत्न आहे असे केयूएफओएसचे सहाय्यक प्राध्यापक राजीव राघवन आणि आययूसीएनचे दक्षिण आशिया संयोजक राजीव राघवन यांनी सांगितले.

------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Discovery new species fish from Konkan by Bombay Natural History Society

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : धैर्यशील माने-सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

SCROLL FOR NEXT