सरकारच्या वेळकाढूपणामुळे ही नामुष्की? सर्वोच्च न्यायालयात कैद्यांची याचिका  
मुंबई

सरकारच्या वेळकाढूपणामुळे ही नामुष्की? सर्वोच्च न्यायालयात कैद्यांची याचिका

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील एकाही तुरुंगात कोरोना रूग्ण नाही, असे दोन आठवड्यापूर्वी न्यायालयात सांगणाऱ्या राज्य सरकार पुढे नामुष्की आली आहे. आर्थर रोड कारागृहसह अन्य काही तुरुंगात कोरोना रुग्ण आता सापडत आहेत. त्यामुळे सरकारने वेळकाढूपणा केल्याने कोरोनाचा शिरकाव झाला, असा आरोप करणारी अवमान याचिका सर्वोच्च न्यायालयात कैद्यांनी दाखल केली आहे. 

काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य सरकारना तुरूंगातील सुमारे 11 हजार कैद्यांना 45 दिवसांच्या तात्पुरता कालावधीसाठी जामीनावर तातडीने सोडावे, असे निर्देश दिले होते. राज्य सरकारने याबाबत समिती नेमून कार्यवाही सुरूही केली असून आतापर्यंत 4 हजार 60 कैद्यांना सोडले आहे. मात्र आता 200 पेक्षा अधिक कैदी कोरोनाने बाधित झाले आहेत. त्यामुळे सरकारने न्यायालयाच्या आदेशचे पालन केले नाही, अशी याचिका औरंगाबादमधील हसुरे तुरुंगातील दोन कैद्यांनी केली आहे. 

आर्थर रोड कारागृहात आठशे कैद्यांची क्षमता आहे. मात्र तेथे तीन हजार पर्यंत कैदी आहेत. राज्यातील अन्य तुरुंगांची क्षमता 14491 बंदींची आहे. मात्र तिथे 25745 कैदी ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे संसर्गाचा धोका येथे अधिक आहे. मात्र सरकार ने कार्यवाही करण्यात ढिसाळ पणा करीत आहे, असा याचिका दारांचा आरोप आहे. उच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल झालेल्या आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Government RTI : माहिती अधिकार कायद्यात बदल होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या इशाऱ्यानंतर सरकारची नरमाई

VTU Result 2026: इतिहास घडला! परीक्षा संपताच अवघ्या ५ मिनिटांत 'व्हीटीयू'चा अभियांत्रिकीचा निकाल जाहीर; ६० हजार विद्यार्थ्यांना दिलासा

Latest Marathi News Live Update : मुंबईतील मॅनहोल दुर्घटनेवर अंबादास दानवेंची टीका; "मृत्यूसाठी महापालिकाच जबाबदार"

IAS Officer Tukaram Mundhe : "मी आयएएसमधून निवृत्त होईन, पण सार्वजनिक सेवेतून कधीही निवृत्त होणार नाही,"; तुकाराम मुंढेंच्या विधानाने नव्या चर्चांना उधाण

Mumbai: उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू, BMC चा निष्काळजीपणा जीवावर बेतला... माणूस पडतानाचा Video समोर... बचावकार्य अपयशी

SCROLL FOR NEXT