मुंबई

अनेक महिन्यांपासून मृतदेह शवागारात; वाचा काय झाले

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयाच्या शवागारातील वातानुकूलन यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे मंगळवारी आवारात दुर्गंधी पसरली. वातानुकूलन यंत्रणेत बिघाड झाल्याने शवागार बंद ठेवण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले. बेवारस मृतदेह पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर शवागाराच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. 
ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतून दररोज 700 ते 800 रुग्ण येतात. प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवती व दाखल झालेल्या शेकडो रुग्णांवर उपचार केले जातात. अपघातात किंवा अन्य कारणांमुळे दगावलेल्या व्यक्तींचे मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात आणले जातात. नियमानुसार सात दिवसापर्यंत मृतदेहाची देखभाल करणे अपेक्षित असते. परंतु, ओळख पटेपर्यंत हे मृतदेह सिव्हिल रुग्णालयाच्या शवागारात ठेवले जातात. या शवागारात क्षमतेपेक्षा अधिक म्हणजे 23 मृतदेह ठेवण्यात आले होते. प्रशासनाने पत्रव्यवहार करूनही पोलिस येथील मृतदेह नेले नाहीत. त्यामुळे पाच-सहा महिन्यांपासून मृतदेह शवागारात आहेत. 

शवागारातील वातानुकूलन यंत्रणा बंद पडण्याचे प्रकार यापूर्वीही झाले होते. आताही काही दिवसांपासून ही यंत्रणा बंद आहे. शवागारातील मृतदेह अन्यत्र नेले जात नाहीत तोपर्यंत वातानुकूलन यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम करता येणार नाही. त्यामुळे सिव्हिल रुग्णालयाच्या प्रशासनाने मंगळवारी रात्रीपर्यंत 18 मृतदेह संबंधित पोलिस ठाण्यांच्या ताब्यात दिले आणि दोन मृतदेह भिवंडीतील रुग्णालयात पाठवले. सध्या येथील रुग्णालयात एकच मृतदेह आहे. त्यामुळे मंगळवारी रात्रीपासूनच वातानुकूलन यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यावर शवागार सुरू होईल, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. 

रुग्णालयातील शवागारात 12 मृतदेह ठेवण्याची क्षमता आहे; मात्र अनेक महिन्यांपासून 23 मृतदेह ठेवण्यात आले आहेत. ठाणे व पालघर जिल्ह्यांतील बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावण्याबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही पोलिसांकडून कार्यवाही होत नव्हती. त्यामुळे बंद पडलेल्या वातानुकूलन यंत्रणेची दुरुस्ती करण्यात अडचणी येत होत्या. सुमारे 16 महिन्यांपूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती, त्यानंतर आता पुन्हा हे काम करण्यात आले. 
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे सिव्हिल रुग्णालय  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पुणे जिल्ह्यातील १३ गावांचा संपर्क तुटला... मुसळधार पावसाचा परिणाम, स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण!

Pune-Bengaluru Highway : पुणे-बंगळूर महामार्गावरील उडतरे उड्डाणपुलावरचा रस्ता गेला वाहून; कोट्यवधींच्या कामाची पावसाने केली पोलखोल, वाहनधारकांकडून तीव्र संताप

Latest Marathi News Update: कळमोडी धरण १०० टक्के भरलं, विसर्गामुळे चासकमानच्या पाणीसाठ्यात वेगानं वाढ

FIFA WORLD CUP: वर्ल्डकप स्पर्धेत डोनाल्ड ट्रम्प यांचा हस्तक्षेप; अमेरिकेचा हुकमी खेळाडू बालोगुनचे ‘रेड कार्ड’ फिफाकडून तात्पुरते रद्द

IND vs ENG: वेगवान गोलंदाजाचा समावेश निश्चित; बिश्नोईला डच्चू मिळण्याची शक्यता; भारत-इंग्लंड आज लढत

SCROLL FOR NEXT