Subhash Bhoir sakal
मुंबई

Dombivali News : दिवा शहराचा कायापालट करणार; माजी आमदार सुभाष भोईर

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचा आमदार असताना सर्वात जास्त आमदार निधी दिवा शहराला दिला होता.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचा आमदार असताना सर्वात जास्त आमदार निधी दिवा शहराला दिला होता. मागील पाच वर्षे दिवा शहराचा विकास रखडला. परंतु येत्या काळात ठाणे महानगरपालिका व शासनाच्या माध्यमातून दिवा शहरासाठी भरघोस निधी प्राप्त करून देण्यासाठी पुढाकार घेवून दिवा शहराचा कायापालट करणार असल्याचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी सांगितले.

चंद्रांगण रेसिडेन्सी समोर मुख्य रस्त्यावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचते त्याचा मुख्य रस्त्यावरून ये-जा करण्याऱ्या तसेच चंद्रागण सोसायटी व परिसरातील सोसायटीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यासाठी व्यापारी तसेच नागरिकांनी माजी आमदार सुभाष भोईर यांच्याकडे आरसीसी गटर करण्याची मागणी केली होती.

त्या ठिकाणी आरसीसी गटर बांधण्यासाठी माजी आमदार सुभाष भोईर यांनी तत्कालीन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे पाठपुरावा करीत असताना त्यांनी त्वरित अहवाल सादर करण्यास सांगितले व विद्यमान आयुक्त सौरभ राव यांनी सदर प्रस्ताव मंजूर करून 55 लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला.

त्यामुळे प्रेरणा टॉवर ते ट्रान्सफार्मर आरसीसी गटर काढण्याचा मार्ग मोकळा झाला. या भूमिपूजन प्रसंगी दिवा गावचा भूमिपुत्र म्हणून दिवा शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी कायम अग्रभागी असल्याचे सांगून दिवा शहराच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

या भूमिपूजन प्रसंगी दिवा शहरप्रमुख सचिन पाटील, शहर संघटिका ज्योती राजकांत पाटील, व्यापारी संघटना अध्यक्ष चेतन भिम पाटील, उद्योजक अनिल भगत, युवा सेना उपजिल्हा अधिकारी स्वप्निल पावशे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump-Putin alaska meeting: ट्रम्प-पुतिन भेट अमेरिका सोडून अलास्कामध्येच का? गुप्त भेटीच्या केंद्रस्थानी भारत

Nicholas Saldanha Died: महाराष्ट्राचे दिग्गज क्रिकेटपटू काळाच्या पडद्याआड, पुण्यात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Politics: व्होटचोरी विरोधातील आंदोलन दडपल्या प्रकरणी कारवाई कराच, काँग्रेसची मागणी

Police officer kicking protester VIDEO: …अन् पोलिस अधिकाऱ्याने फिल्मी स्टाईलने 'त्या' आंदोलकाच्या कंबरेत घातली लाथ ; व्हिडिओ व्हायरल !

Local Megablock: प्रवाशांनी खबरदारी घ्या! मुंबई लोकलच्या मार्गावर रात्र आणि दिवसाचा मेगाब्लॉक, कधी आणि कुठे? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT