मुंबई

सरावाची जिद्द! दिव्यांश सिंगने घरातच तयार केले शूटिंग रेंज

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोरोनाच्या आक्रमणामुळे जगच लॉकडाऊन झाले आहे. खेळाडूंना नियमीत सराव होत नाही. त्यात ऑनलाईनची स्पर्धा जाहीर झाली आणि आघाडीचा नेमबाज दिव्यांश सिंग पन्वर आणि त्याचे मार्गदर्शक दिपक दुबे यांनी घरातच शूटिंग रेंज तयार केली. दहा मीटर अंतरावरील लक्ष्य साधण्यासाठी मागे जागा रहावी यासाठी त्यांनी टार्गेट थेट कपाटातच वसवले आणि आता ते ऑनलाईन नेमबाजी स्पर्धेसाठी तयार झाले आहेत.

कोरोनामुळे सर्व शूटिंग रेंज बंद आहेत, त्यामुळे जगातील अव्वल नेमबाज दिव्यांशच्या सरावावर परिणाम झाला होता. त्यामुळे त्याची केवळ ड्राय प्रॅक्टीस सुरु होती, पण ऑनलाईन स्पर्धेचे समजल्यावर दिव्यांशचे मार्गदर्शक दीपक दुबे यांनी याबाबत विचार सुरु केला आणि अखेर घरात रेंज तयार केली. ``आम्ही घरातील सर्व ठिकाणचे अंतर मोजले आणि त्या ठिकाणी हे योग्य अंतर दिसले. कपाटाच्या खणात टार्गेट ठेवल्यावर काहीच प्रश्न आला नाही," असे दुबे यांनी सांगितले. पण त्यांनी सांगितले, तितक्या सहजपणे हे घडले नाही. 


दुबे तसेच दिव्यांशचा तीन बीएचके फ्लॅट आहे. दोघे फार दूर रहात नाहीत. सुरुवातीस दिव्यांशच्या घरात तपासणी केली, तर अंतर नीट मिळत नव्हते. त्यामुळे मार्गदर्शक दुबे यांनी त्यांच्या घरात ठिकठिकाणी अंतर मोजताना विविध पर्याय तपासले आणि त्याचवेळी टार्गेट वसवण्यासाठी कपाटही मिळाले. एक बेडरुम, हॉल आणि एक  रुम हे मिळून हे रेजं तयार झाली आहे, असे दुबे यांनी सांगितले. त्यांनी आता आम्ही या स्पर्धेसाठी तयार आहोत असे सांगितले. 

कोरोनामुळे स्पर्धा कधी सुरु होतील हे सांगता येत नाही, रेंज ऊघडण्यास कधी मंजूरी मिळेल हे माहीती नाही, त्यामुळे काही दिवसांपर्यंत केवळ होल्डींगचा सराव करीत होतो किंवा ड्राय प्रॅक्टीस (प्रत्यक्ष गोळी न झाडता लक्ष्य साधण्याचा सराव करणे) करत होतो. ऑनलाईन स्पर्धेचे कळल्यावर घरातील दोन स्कॅट वापरण्याचे ठरवले, पण ते मोबाईलला कनेक्ट होत नव्हते. माझी अकादमी शेजारीच आहे, त्यामुळे मी तेथून इलेक्ट्रॉनिक टार्गेट घेऊन आलो. घरात जिथे रेंज होऊ शकेल अशा जागा मोजल्या. सुरुवातीस लॉबी बघितली, पण लक्ष्य साधण्यासाठीचे अंतर सोडल्यावर साडेसात मीटरच झाले. त्यानंतर अनेक ठिकाणी पाहिले. अखेर जेंव्हा कपाट धरुन अंतर मोजले, त्यावेळी ते साडेबारा मीटर झाले. त्यामुळे दिव्यांशला लक्ष्य साधण्यासाठी जागा आहे हेही लक्षात आले. तसेच मलाही उभे राहयला जागा आहे. त्याचबरोबर टार्गेटच्या जवळ पिवळा कागद लावला आहे, त्यामुळे ते पाहून रेंजवरच उभे असल्याचे वाटत आहे, असे आंतरराष्ट्रीय पंचही असलेल्या दुबे यांनी सांगितले. त्याचवेळी त्यांनी दोन्ही दरवाजे बरोबर एकमेकांच्या समोर आहेत आणि शूटिंग लेन बसवण्यासाठी जी जागा लागते, त्यापेक्षा कोणत्याही घरातील दरवाजाची जागा मोठीच असते.  


घरातील भिंतीवर फारसे काहीही नाही. आहेत त्या दूर करता येतील. त्याहून महत्त्वाचे म्हणजे नेमबाजाचे लक्ष्य पूर्णपणे टार्गेटवरच असते. तिथेच त्याचे लक्ष्य केंद्रीत असणे आवश्यक असते, अन्य काही गोष्टी विचलीत करीत असतील तर चांगलेच आहे, रेंजवरही स्पर्धा सुरु असताना काही अडथळे अचानक येऊ शकतात, त्यामुळे एक प्रकारे सरावच होईल.
- दीपक दुबे, दिव्यांश सिंग पन्वरचे मार्गदर्शक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock : 'या' एका स्टॉकने गुंतवणूकदारांची केली चांदी! तुमची १ लाखाची गुंतवणूक आज झाली असती ६४ लाख रुपये...

Latest Marathi News Live Update : पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून उमेदवारांच्या प्रचारार्थी मॅरेथॉन बैठका

Video : अर्जुन स्वतःच्या जीवाशी खेळून महिपतला पोलिसांच्या हवाली करणार ! नव्या ट्विस्टने प्रेक्षकही चकित

Mumbai Election : भाजपमधून  26  बंडखोरांची हकालपट्टी; मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांची कारवाई, सहा वर्षांसाठी पक्षातून केलं निलंबन

Whatsapp : पालकांसाठी खुशखबर! व्हॉट्सअ‍ॅपची लपवा-छपवी संपणार; तुमची मुलं काय करतात, कुणाशी बोलतात सगळं कळणार, नवीन फीचर काय आहे पाहा

SCROLL FOR NEXT