sakal
मुंबई

जाता जाता पुण्य करून जावे! राज्यपालांना संजय राऊतांचा चिमटा

१२ आमदारांच्या फाईलवर सही करून जावे. थोडे पुण्य पदरात पडेल, असा चिमटा शिवसेना नेते संजय राऊत यांनी काढला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी हे महाराष्ट्रात, राजभवनात चांगले रमले आहेत. अनेक कामे करता करता पक्षकार्यही करत आहेत. त्यांनी उत्तराखंडला परत जाऊ नये, अशी आमची इच्छा आहे; पण त्यांना जायचेच असेल, तर १२ आमदारांच्या फाईलवर सही करून जावे. थोडे पुण्य पदरात पडेल, असा चिमटा शिवसेना नेते संजय राऊत यांनी काढला.

उत्तराखंड राज्याची विधानसभा निवडणूक पुढील काही महिन्यात होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कोश्‍यारी यांनी पुन्हा उत्तराखंडात जाऊन पक्षासाठी काम करण्याची इच्छा नेतृत्वाकडे व्यक्त केली असल्याचे समजते. त्याबाबत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘याबाबत अधिकृतपणे काही माहिती नाही. त्यांनी चांगले काम केले आहे.

राजकरण न करता त्यांनी काम केले असते, तर महाराष्ट्राला त्यांच्या अनुभवाचा फायदा झाला असता. येथील भाजपसोबत त्यांचे चांगले जमले होते; तरीही त्यांना जायचे असेल तर त्यांनी १२ आमदारांच्या फाईलवर सही करून जावे. तेवढेच पुण्य, असे राऊत म्हणाले. महाराष्ट्र आणि त्यांचे अजिबात भांडण नाही. आम्ही त्यांचा आदर करतो, त्यांनीही आमचा आदर करावा, अशी पुष्टीही राऊत यांनी जोडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: 1 एप्रिलला बँका सुरू की बंद? बँकेत जाण्याआधी RBI काय सांगते नक्की जाणून घ्या

Iran IRGC Threat : जागतिक डिजिटल संकट ओढावणार ? इराणकडून अमेरिकेतील Google, Apple सह AI कंपन्या उडवण्याची धमकी

Anand Mahindra: लोक हसले, पण तो काम करत राहिला! एका मुलाने स्वच्छ केली संपूर्ण नदी, आनंद महिंद्रा यांनीही केले कौतुक

Chhatrapati Sambhajinagar: जिल्हा बँकेचे नामांतर अडकले रिझर्व्ह बँकेकडे; जिल्ह्याचे नामकरण होऊन तीन वर्षे उलटली तरी प्रस्तावाला मंजुरी मिळेना

Latest Marathi News Live Update : माजी खासदार हेमंत गोडसे वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT