File Photo 
मुंबई

शाैचालय, टॅंकरच्या पाण्याचे पैसे घेऊ नका

सकाळ वृत्तसेवा

मिरा रोड (बातमीदार) : पालिकेद्वारे शहरातील सार्वजनिक शौचालय आणि टॅंकरद्वारे पुरविण्यात येणाऱ्या पाण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात शुल्क आकारू नये, अशी सूचना मिरा-भाईंदरच्या महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी शहर अभियंता शिवाजी बारकुंड यांना केली आहे. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

सध्या शहरातील विविध वस्त्यांमध्ये नागरिक अनेक समस्यांना तोंड देत आहेत. अशा वस्त्यांमध्ये मनपाच्या माध्यमातून टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी काही शुल्क आकारून पुरवण्यात येते. मात्र सध्या नागरिकांना पैसे देणे शक्‍य नसल्याने महापौरांनी टॅंकरचे पाण्यासह शौचालयासाठी शुल्क न आकारण्यास  सांगितले आहे.

प्रत्येक शासकीय यंत्रणेबरोबरच निमशासकीय व्यक्ती, अनेक संस्था, मंडळे कोरोना विषाणूच्या लढाईत लोकांच्या सेवेसाठी सामाजिक भूमिकेतून प्रशासनाला आणि जनतेला मदतीचा हात पुढे करत आहेत. यामुळे जनतेने बाहेर जाणे टाळून घरात, परिवारात आनंदाने दिवस घालवावा, परिवाराला वेळ द्या, हीच देशसेवा आहे.
- ज्योत्स्ना हसनाळे,
महापौर, मिरा-भाईंदर महापालिका

Do not charge for toilet water

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

होर्मुझ उघडा नाहीतर खार्ग उडवू, तेल विहिरी पेटवू! ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा, इराणचं पिण्याचं पाणीही धोक्यात?

Akola Civic Row: ‘पन्नास खोके’ घोषणांवरून अकोला महापालिकेत गोंधळ; महापौरांचा १६ विरोधी नगरसेवकांना तीन सभांसाठी निलंबनाचा निर्णय

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांवरून वाद चिघळला, रहिवासी आणि प्राणीमित्रांतील वाद विकोपाला; विरोधी गुन्हे दाखल

IPL 2026, RR vs CSK: धोनीशिवाय चेन्नई मैदानात, संजू सॅमसनचं पदार्पण, तर जडेजाची राजस्थानसाठी घरवापसी; पाहा प्लेइंग इलेव्हन

Pune News : पुणे जिल्हा परिषदेच्या चार विषय समित्यांसाठी जिल्ह्यात मोठी फिल्डींग! सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्याकडे इच्छुकांचे लॉबिंग

SCROLL FOR NEXT