biometric attendance 
मुंबई

बायोमेट्रीक हजेरीची पद्धत पुन्हा सुरू करण्यास कामगार संघटनांचा विरोध; पालिकेत संघर्ष होण्याची शक्यता..

सकाळ वृत्तसेवा, सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने बंद केलेली बायोमेट्रीक हजेरीची पद्धत पुन्हा सुरू करण्यास कामगार संघटनांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे बायोमेट्रीक हजेरी पद्धतीवरून पालिकेत लॉकडाऊनच्या काळात संघर्ष होण्याची शक्यता आहे. 

मुंबई महापालिकेत बायोमेट्रीक हजेरीची पद्धतीवरून सुरुवातीपासूनच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही पद्धत सदोष असल्याने कामगारांची गैर हजेरी लागण्याचे प्रमाण वाढले होते. त्याचा आर्थिक फटका कामगारांना सहन करावा लागला . त्याचे पडसाद पालिका सभागृहात आणि स्थायी समितीच्या बैठकीत उमटले होते. 

राज्य सरकार, मुंबई महापालिका आणि इतर निमशासकीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रीक हजेरीची पद्धत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आली होती. पालिकेत 100 टक्के उपस्थिती बंधनकारक करून बायोमेट्रीक हजेरीची पद्धत पून्हा सुरू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. 

लॉकडाऊन शिथिल करण्याच्या दुसऱ्या टप्प्यानंतर पुन्हा एकदा बायोमेट्रीक हजेरी मुंबई महापालिकेत बंधनकारक होणार असल्याने कामगारांमध्ये असंतोष वाढत आहे.  येत्या सोमवारपासून महापालिकेत बायोमेट्रीक हजेरीच्या नोंदीसह कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थितीही बंधनकारक करण्याचे परिपत्रक सामान्य प्रशासनाच्या वतीने परिपत्रक जारी केले असून या परिपत्रकालाही कामगार संघटनांनी विरोध केला आहे. 

निर्णय स्थगित करा:

55 वर्ष आणि त्यावरील कामगारांना आणि आजारपण असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर सूट देण्यात यावी, बायोमेट्रीक हजेरीची पद्धत सुरक्षेच्या कारणामुळे पावसाळा संपेपर्यंत स्थगित करावी अशी मागणी बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनचे अध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष यांनी केली आहे.

do not give permission to biometric attendance 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chamoli Tunnel Collapse: अचानक स्फोटाचा आवाज, काही क्षणांत टनल बनली ‘मृत्यूचा सापळा’; 7 जणांचा मृत्यू, वाचलेल्यांनी सांगितला थरार

MD Smuggling: एमडी तस्करीसाठी दुबईतून फंडिंग; जरीपटका येथील मुख्य आरोपीविरोधात ‘लुक आऊट’ नोटीस

Maharashtra River Linking: मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा! महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प; याच वर्षी काम सुरू होणार

Marathi News Live Updates : वीर धरणातून 5,737 क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रात सुरू

Kolhapur Baby Death : दूध पाजताना काळजी घ्या! अवघ्या 31 दिवसांच्या बाळाचा ठसका लागून दुर्दैवी अंत; कोल्हापुरातील काळीज पिळवटून टाकणारी घटना

SCROLL FOR NEXT