मुंबई

जोपर्यंत कोरोनावर लस येत नाही तोपर्यंत शाळेची घंटा बंद! वाचा कोण म्हणतंय

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः कोरोना महामारीची साथ मुंबई तसेच उपनगरात वाढत आहे. मात्र त्याचवेळी शाळा सुरु करण्याबाबत विचार होत आहे. आता जोपर्यंत कोरोनावरील लस तयार होत नाही, तोपर्यंत शाळा सुरु न करण्याची विनंती पालकांच्या संघटनेने केली आहे. त्यांनी यासंदर्भात महाराष्ट्राच्या शैक्षणिक मंत्री वर्षा गायकवाड यांना सूचनांचे निवेदन दिले असल्याचे समजते.

राज्यातील शाळा सुरु करण्याची घाई सरकारने करु नये. त्यामुळे विद्यार्ध्यांना कोरोनाची बाधा होण्याचा धोका असेल. जोपर्यंत कोरोनावरील लस मिळत नाही, तोपर्यंत ऑनलाईन लर्निंग सुरु ठेवता येईल. सध्याच्या परिस्थितीत अनेक पालक मुला-मुलींना शाळेत पाठवण्यास तयार नाहीत, असे अनुभा सहाय यांनी सांगितले. सहाय या इंडिया वाईड पॅरेंटस्् असोसिएशनच्या अध्यक्षा आहेत. 
शाळा सध्या सुरु न करण्याची प्रमुख मागणी असली तरी त्याबरोबरच शाळा बंद असतानाही त्यांचे व्यवस्थापन शुल्कासाठी पालकांवर दबाव आणत असल्याची तक्राही करण्यात आली. शाळा बंद असल्यामुळे त्यांचा खर्च कमी झाला आहे, तरीही शुल्कात कपात केलेली नाही. शैक्षणिक विभागाने पालकांच्या सर्व तक्रारीची आम्ही दखल घेत असल्याचे सांगितले.

दरम्यान, शाळांचे शुल्क न देणाऱ्या पालकांच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप अनेक पालंकाकडून होत आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून रोखले जात असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT