Queen Elizabeth II
Queen Elizabeth II sakal
मुंबई

Queen Elizabeth II: मुंबईच्या डबेवाल्यांसोबत राणी एलिझाबेथ यांचे खास नाते

सकाळ डिजिटल टीम

96 वर्षांच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी निधन झाले. मागच्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. स्कॉटलंडमधील बाल्मोरल कैसल येथे त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर फक्त ब्रिटनमध्येच नाही तर भारतात सुद्धा दुःख व्यक्त केले जात आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, की मुंबईच्या डबेवाल्यांचे राणी एलिझाबेथसोबत जवळचे नाते आहे. हो, हे खरंय. आज आपण या संदर्भातच जाणून घेणार आहोत.

जेव्हा 2003 मध्ये राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे सुपुत्र प्रिन्स चार्ल्स भारत दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी डबेवाला असोसिएशनला भेट दिली होती. असे म्हटले जाते की, प्रिन्स चार्ल्स यांनी मुंबईच्या डबेवाल्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा डबेवाल्यांनी त्यांच्या समोर दोन अटी ठेवल्या होत्या.

एक म्हणजे सगळे डबे पोहोचवल्यानंतरच ते त्यांना भेटू शकतील कारण लंडनच्या राजाला भेटण्यासाठी दोन लाख लोकांना ते वाट बघायला लावू शकत नाहीत आणि दुसरी म्हणजे प्रिन्स चार्ल्स स्वतः त्यांना भेटायला आले पाहिजेत. या दोन्ही अटी प्रिन्स चार्ल्स यांनी मान्य केल्या होत्या.

2005 मध्ये जेव्हा प्रिन्स चार्ल्स आणि कैमिला पार्कर यांचे लग्न झाले तेव्हा मुंबईच्या डबेवाला ऑर्गनायझेशनला या लग्नाचे आमंत्रण मिळाले होते त्यावेळी असोसिएशनचे दोन पदाधिकारी रघुनाथ मेडगे आणि सोपान मारे हे त्या लग्नात सहभागी झाले होते. त्यांनी साडी आणि सदरा ही महाराष्ट्रीयन भेटवस्तू दिली होती. 2018 मध्ये जेव्हा प्रिन्स हैरी आणि मेगन मर्केल यांचे लग्न झाले त्यावेळी सुद्धा डबेवाल्यांनी हाताने बनवलेली हिरवी आणि नारंगी रंगाची पैठणी साडी आणि केसरी रंगाचा सदरा भेटवस्तू दिली होती.

शहरात सरकारी आणि खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या घरापासून ऑफिसपर्यंत डबा पोहोचवणाऱ्या लोकांचा समूह म्हणजे मुंबईचा डबेवाला असोसिएशन आहे. या संस्थेमध्ये 5000 कर्मचारी आहेत जे दोन लाखापेक्षा जास्त लोकांना डबे पोहोचवतात.1890 मध्ये सुरू झालेल्या या ऑर्गनायझेशनच्या ड्रेस कोड मध्ये सफेद टोपीचाही समावेश होतो.

एलिझाबेथ यांच्या निधनावर मुंबईच्या डबेवाला असोसिएशन दु:ख व्यक्त करत त्यांना श्रंद्धाजली वाहली. प्रिन्स चार्ल्स जेव्हा भारतात आले होते तेव्हापासून मुंबईच्या डबेवाला असोसिएशनचे ब्रिटनच्या या शाही परिवारासोबत जवळचे संबंध आहेत .आम्ही सगळे डबेवाले त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना करतो, असे असोसिएशनचे चेअरमन सुभाष तळेवाले यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस; महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळीनं झोडपलं

SCROLL FOR NEXT