doctors 
मुंबई

मुलीचा पहिला वाढदिवस असा साजरा करावा लागेल असा त्यांनी विचारही केला नसेल, पण डॉक्टरांनी....

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोरोना व्हायरसच्या वाढत्या फैलावामुळे संपूर्ण देशामध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशातील आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत असून या आजारातून सुखरूप बाहेर येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

भारतामध्ये कोरोना रुग्णांचा आकडा एक लाखाच्यावर गेला असून अनेक गर्भवती माता आणि लहान मुलांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर सरकारी आणि खाजगी हॉस्पिटमध्ये डॉक्टर, नर्सेस, पॅरा मेडिकल स्टाफद्वारे यशस्वी उपचार सुरु आहेत.

भारतामध्ये अनेक लहान मुले आपला वाढदिवस साजरा न करता त्या पैशामध्ये गरजुंना मदत करत असल्याचे दिसून येत आहे, कोरोनाच्या या संकटात वाढदिवस साजरा न करता अनेक नागरिक सामाजिक बांधिलकी जपत आहेत, परंतु वाढदिवस साजरा करून अनोख्या ढंगात सामाजिक बांधीलकी जपल्याची एक घटना आज तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेन्टरमध्ये दिसून आले. 

तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेन्टरमध्ये उपचार सुरु असलेल्या एक वर्षीय कोरोनाग्रस्त मुलीचा वाढदिवस येथील डॉक्टरांच्या मदतीने वैद्यकीय काळजी घेऊन साजरा करण्यात आला. केक कापतानाही तिच्या आईवडिलांनी आणि डॉक्टरांनी पीपीई किट्स घातले होते. तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेन्टर येथे एक कोरोनाग्रस्त दांपत्य दाखल झाले असून त्यांच्या एक वर्षाच्या मुलीला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असून तिच्या वडिलांनाही कोरोना संसर्ग झाला होता. या मुलीची आई कोरोनाची संशयित रुग्ण असून तिला सुद्धा विलगीकरण कक्षामध्ये ऍडमिट केले आहे.

23 मे या दिवशी मुलीचा पहिला वाढदिवस होता मात्र, तिचे आई वडील तिच्याजवळ असूनही तिचा वाढदिवस साजरा करू शकत नव्हते. दोन महिन्यापूर्वी त्यांनी आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात करण्याचे ठरवले होते, परंतु, कोरोना संकटात हे कुटुंब अडकल्यामुळे त्यांची ही इच्छा अपुरी राहणार काय अशी चिंता त्याना सतावत होती.

 तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरच्या डॉक्टरांनी या कुटुंबाची ही इच्छा पूर्ण केली. तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केक आणून या मुलीचा वाढदिवस साजरा केला. कोरोनाच्या संकटात आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा केल्यामुळे या दापंत्याचा आनंद गगनात मावेनासा होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Installment : लाडक्या बहि‍णींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? मोठी अपडेट समोर

जान्हवीला वाचवणाऱ्या रामचरणच्या बॉडीगार्डची सगळीकडे चर्चा, नक्की आहे कोण? पगार ऐकून थक्क व्हाल

Consumer Commission : कन्फर्म तिकीट होतं, तरी संपूर्ण प्रवास उभ्याने; अखेर रेल्वेलाच मोजावी लागली मोठी किंमत, नेमकं काय घडलं?

Child Drowns in River : वडील पोहत असताना पोटचा गोळा बुडाला, कोल्हापुरातील शिंगणापूर बंधाऱ्यावरील घटना

Vaibhav Sooryavanshi ला भारतीय संघात 'या' मालिकेसाठी संधी मिळणार! निवड समितीच्या मिटिंगला नवा T20I कर्णधारही राहणार हजर

SCROLL FOR NEXT