मुंबई

"'या" जाचातून डॉक्‍टरांची सुटका 

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : डॉक्‍टरांना उद्योग परवाना लागू करण्यात येऊ नये, असा ठराव आजच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे आजच्या महापौरांच्या जनसंवादामध्येही ठाण्यातील डॉक्‍टरांच्या संघटनांनी या परवान्यामधून वगळण्याची मागणी महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे केली होती. त्यानंतर हा विषय आजच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित झाल्यानंतर डॉक्‍टरांना उद्योग परवाना लागू करण्यात येऊ नये असा ठराव मंजूर करण्यात आला. 

विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी यांनी हा ठराव मांडल्यानंतर त्याला सभागृह नेते अशोक वैती यांनी अनुमोदन दिले. डॉक्‍टरांचा व्यवसाय सेवा क्षेत्रात येत असल्याने त्यांना उद्योगाचे नियम लागू करण्यात येऊ नयेत, अशी भूमिका बहुसंख्य नगरसेवकांनी मांडली. तसेच डॉक्‍टरांच्या या मागणीला पाठबळ मिळावे, यासाठी ठरावाची मागणी करण्यात आली. त्यानुसार आज ठराव करण्यात आला. 

शहरातील नर्सिंग होम आणि हॉस्पिटलचादेखील परवाना शुल्कामध्ये समावेश करण्यात आला आहे; मात्र नियमानुसार हे परवाने लागू होत नसल्याने ते रद्द करण्यात यावेत, घनकचरा सेवा शुल्क रद्द करण्यात यावे आदींसह इतर मागण्यांसाठी सोमवारी सकाळी जनरक्षा संघटना आणि डॉक्‍टरांच्या इतर संघटनांनी महापौरांची भेट घेतली. त्यानुसार हे परवाने लागू न करण्याचा निर्णय घेतला जाईल आणि इतर मागण्यांचाही विचार करून त्यावर तोडगा काढण्यात येईल, असे आश्‍वासन महापौर नरेश म्हस्के यांनी दिले होते. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्हाला उद्योग परवाना शुल्क लागू होत नसल्याची भूमिका डॉक्‍टरांनी मांडली. तसेच एकीकडे आम्ही बायोमेडिकल वेस्टेजचे शुल्क भरत असतानाही पालिकेने घनकचरा सेवा शुल्क लागू करण्याचे निश्‍चित केले आहे. त्यामुळे हा करही रद्द करण्याची मागणी या वेळी करण्यात आली आहे. नर्सिंग होम आणि हॉस्पिटल रजिस्ट्रेशनचे शुल्कही इतर महापालिकांच्या तुलनेत अधिक आहे, तेसुद्धा कमी करण्यात यावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली आहे. 

"महापौर जनसंवाद' या उपक्रमास प्रतिसाद 
महापौर नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून प्रशासनाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या आजच्या पहिल्या "महापौर जनसंवाद' या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महापौर जनसंवादातच बाधितांचे पुनर्वसन, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, भटक्‍या कुत्र्यांची समस्या, येऊर येथील साफसफाई, वैद्यकीय सेवा सुविधा, दिव्यांगांचे प्रश्‍न आदी 20 तक्रारींचे निराकरण करण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांना लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना थेट भेटून समस्या मांडता याव्यात यासाठी महापौर नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून व आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या पुढाकाराने सुरू केलेल्या महापौर जनसंवाद या उपक्रमाचा शुभारंभ आज करण्यात आला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

Pune News : दहीहंडीत विनापरवाना लावणी; नृत्यांगणांसह आयोजकांवर गुन्हे

स्टार प्रवाहचं वेळापत्रक बदललं! ‘मी कात टाकली’साठी ‘या’ लोकप्रिय मालिकेला नवी वेळ; आता किती वाजता होणार प्रसारित?

SCROLL FOR NEXT