मुंबई

रिपोर्ट येण्याआधीच डॉक्टरांनी मृतदेह दिला नातेवाईकांच्या ताब्यात आणि फुटला कोरोना बॉम्ब...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाचा संसर्ग झालेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकही येत नाहीत असं काही दिवसांपूर्वी मुंबईच्या काही रुग्णालयांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र उल्हासनगरात भलताच प्रकार घडला आहे. मृतदेहाला अंत्यसंस्कारादरम्यान पाणी पाजणं काही लोकांना चागलंच महागात पडलं आहे.

काय आहे प्रकरण: 

उल्हासनगरमध्ये राहणारा ४५ वर्षाचा एक व्यक्ती एका खासगी वाहनावर चालक होता. त्यामुळे त्याला मुंबईला सतत येणं-जाणं करावं लागत होतं. मात्र काही दिवसांपूर्वी  या व्यक्तीला चक्कर आल्याने चक्कर ते रस्त्यावर पडलेत. त्यामुळे त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. मात्र त्याची कोरोनाची टेस्ट करण्यात आली आणि रिपोर्ट येण्याआधीच रुग्णालयानं त्याच्या नातेवाईकांना कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहाप्रमाणे त्याचा मृतदेह बांधून दिला होता. 

नातेवाईकांनी त्याचं पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी घरी ठेवलं. अंत्यसंसकाराला बरीच गर्दी झाली होती. मात्र यापुढे जे घडलं ते धक्कादायक होतं. नातेवाईकांनी अंत्यसंस्कारादरम्यान मृतदेहाला पाणी पाजलं. दुसऱ्या दिवशी त्याचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे या मृतदेहाचे नातेवाईक आणि अंत्ययात्रेत सामील झालेल्या तब्बल ७० जणांची कोरोनाची टेस्ट करण्यात आली आहे. 

यापैकी आतापर्यंत तब्बल १९ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. उल्हासनगर कॅम्प नं-३ हिराघाट परिसरातली ही घटना आहे. याआधीही अशीच घटना या परिसरात घडली होती. 

relatives feed water to dead body while funeral  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : अमित ठाकरे सपत्नीक वरळी डोममध्ये पोहचले; राज अन् उद्धव ठाकरेही रवाना

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

Marathi Bhasah Vijay Melava : मुंबईत राजकीय वातावरण तापलं, दादरमध्ये मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात...

Asaduddin Owaisi: ओवेसींच्या एमआयएमने बिहार महाआघाडीत सामील होण्याची इच्छा व्यक्त

SCROLL FOR NEXT