मुंबई

यंदा लाल नव्हे तर पांढऱ्या कपड्यांमध्ये आला सांता आणि  मुलांच्या चेहऱ्यावर उमटलं स्मितहास्य

भाग्यश्री भुवड

मुंबई, 26: तसतर सांता लाल रंगीत पोषाखात आणि टोपीमध्ये दिसतो. मात्र, पालिकेच्या मुलुंडमधील कोविड केअर सेंटरमध्ये सांता एक पांढरा पीपीई किट आणि मुखवट्यात दिसला. मात्र, हा कोणी खराखुरा सांता नव्हता तर ते रुग्णालयातील डाॅक्टरच होते. कोरोना बाधित मुलांच्या चेहऱ्यावर आनंद देण्यासाठी डाॅक्टरांनी ख्रिसमस साजरा केला. 

प्रत्येकालाच कोरोनापासून संसर्ग झाला आहे. कारण त्याच्या संपर्कात येणारे अन्य लोक देखील संक्रमित झाले आहेत. रूग्ण, मुले असोत वा ज्येष्ठ नागरिक प्रत्येकाला रुग्णालयात एकटेच रहावे लागते. अशा परिस्थितीत आपले एकटेपणा, ताणतणाव आणि चिंता यावर मात करण्यासाठी पालिकेने एका स्मार्ट फोनची व्यवस्था केली जेणेकरून ते आपल्या घरच्यांशी बोलू शकतील. तणावमुक्त होण्यासाठी समुपदेशनाचीही व्यवस्था केली आहे. शिवाय, रूग्णांना आनंदी करण्यासाठी मुलुंडमध्ये जंबो कोविड केअर सेंटर ख्रिसमस साजरा करण्यात आला. डॉक्टरांनी केंद्रात दाखल झालेल्या मुलांसाठी केक आणले आणि इतर रुग्णांना चॉकलेट दिले. 

कोविड केअर सेंटरचे अधीक्षक डॉ. प्रदीप आंग्रे यांनी सांगितले की ज्येष्ठ तर त्यांचे मनोरंजन करतात परंतु मुलांना आनंद देण्यासाठी आमच्या डॉक्टरांनी या गोष्टी आयोजित केल्या आहेत. हेही लक्षात घेण्यासारखे आहे की दिवाळीतही काही जंबो कोविड केअर सेंटरमधील रूग्णांना भोजन वाटप करण्यात आले.

doctors wearing PPE kit becomes Santa clause for small kids already admitted to covid center

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT