chandan shirsekar
chandan shirsekar sakal
मुंबई

Dombivali Crime : हाय, हॅलो, भेटू शकता का? भाजपा आमदारांच्या नावाचे फेक फेसबुक अकाऊंट

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - हाय, हॅलो, तुम्ही भेटू शकता का? असे संदेश भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्या नावे असलेल्या फेसबुक अकाउंट वरून महिलांना येत होते.

फेसबुकवर आमदारांच्या नावे फेक अकाउंट बनवत महिलांना मॅसेज पाठवणाऱ्या तरुणाला कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. काही महिलांनी आमदार गणपत गायकवाड यांना तुम्ही आम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली आहे का? असे विचारल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी आमदार गायकवाड यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी फेक आकाऊंट तयार करत महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मेसेज करणाऱ्या चंदन सुभाष शिर्सेकर (वय 28) या तरुणाला बेड्या ठोकल्या.

चंदन हा ओला कारचा ड्रायव्हर आहे. त्याने हा प्रकार कुणाच्या सांगण्यावरुन केला याचा तपास पोलिस करत आहेत. मात्र या प्रकरणाशी संबंधित सूत्रधाराला लवकरच अटक करण्यात यावी, अशी मागणी आमदार गणपत गायकवाड यांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वी कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांचा एक व्हिडियो व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्यांच्या आवाजाऐवजी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज मॉर्फ करण्यात आला होता. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात भाजपाकडून तक्रार दाखल करण्यात आली होती.

हे प्रकरण ताजे असताना काही दिवसांपूर्वी आमदार गायकवाड यांच्या नावाने फेसबुकवर फेक आकाऊंट तयार करण्यात आले. या अकाऊंटच्या मेसेंजरद्वारे महिलांना फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविण्यात आली होती. त्यामध्ये हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, तुम्ही भेटू शकता का? असे मेसेज महिलांना पाठविण्यात आले होते.

त्यापैकी काही महिलांनी थेट आमदार गणपत गायकवाड यांना विचारणा केली. तुम्ही मला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली आहे का? अशी विचारणा केली. हे ऐकून गायकवाड यांनी धक्काच बसला. आपण कुणालाही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली नसताना ही विचारणा कशी काय झाली? असा सवाल आमदार गायकवाड यांना पडला.

कुणीतरी आपल्या नावाचे फेसबुकवर फेक अकाऊंट तयार करून हा प्रकार करत असल्याचे आमदार गायकवाड यांच्या लक्षात आले. त्यांनी थेट या संदर्भात ठाणे जिल्हा शहर पोलिस आयुक्त जयजित सिंग यांच्याकडे तक्रार केली. आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी उल्हास जाधव, हरिदास बोचरे यांनी तपास सुरु केला.

या प्रकरणात चंदन सुभाष शिर्सेकर या 28 वर्षीय तरुणाला अटक केली. चंदन हा कोळसेवाडी परिसरात राहणारा आहे. तो ओला कारचा ड्रायव्हर आहे. आरोपी चंदन याने फक्त दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. विशेष म्हणजे आपण पकडले जाऊ नये यासाठी दुसऱ्यांचे वायफाय आणि हॉटस्पॉटचा तो वापर करत असे. रविवारी दुपारी चंदनला कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

चंदन याने हा प्रकार का केला ? कुणाच्या सांगण्यावरुन केला आहे का? महिलांना असे मेसेज पाठवून काही आर्थिक फायदा करवून घेतला आहे का? आदी प्रश्नांची उकल करण्यासाठी पोलिसांनी तपासचक्रांना वेग दिला आहे.

या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार गणपत गायकवाड म्हणाले, चंदन हा शिकलेला नाही. त्याने कुणाच्या सांगण्यावरुन हा प्रकार केला आहे. त्यामागे माझी बदनामी करण्याचा उद्देश आहे. पोलिसांनी लवकरात लवकर सखोल चौकशी करुन यामागील सूत्रधारालाही अटक करावी, अशी आमदार गायकवाड यांनी मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT