Crime Bar and Restaurant Sakal
मुंबई

Dombivali Crime : पैसे न दिल्याने बारमधील कॅशिअरला बेदम मारहाण; पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

कल्याण पश्चिमेतील इंदिरानगर भागातील एका बार अँडण्ड रेस्टॉरंट मध्ये दारु न दिल्याने तिघांनी हॉटेल मधील कॅशिअरला बेदम मारहाण केल्याची घटना घडली.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण पश्चिमेतील इंदिरानगर भागातील एका बार अँड रेस्टॉरंट मध्ये दारु न दिल्याने तिघांनी हॉटेल मधील कॅशिअरला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कॅशिअर सुरजकुमार चौपाल (वय 24) यांनी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार सिद्धेश उर्फ भोप्या सुनील जाधव, दत्ता सुनील जाधव आणि अन्य एक अशा तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.

बिर्ला महाविद्यालय रस्त्यावरील इंदिरानगर मध्ये रामण्णा शेट्टी आणि राजेश शेट्टी यांचे डिव्हाईन बार अँड रेस्टॉरंट आहे. सुरजकुमार हे त्या ठिकाणी कॅशिअर म्हणून काम पहात आहेत. सोमवारी सायंकाळी मिलिंदनगर मध्ये राहणारा दत्ता, सिद्धेश व अन्य एक जण त्याठिकाणी आले होते. त्यांनी आल्या आल्या मोठ्याने आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली.

हॉटेलचे चालक रामण्णा यांच्या नावाने ओरडा करत त्यांनी आम्हाला तात्काळ पैसे पाहीजे आहेत असे म्हणत पैशांची मागणी केली. कॅशियर सुरजकुमार हे तिघांना समजावत होते. हॉटेल चालक आले की आपली भेट घालून देतो असे सुरजकुमार तिघांना सांगत होता.

तेवढ्यात आरोपींनी सोडा वॉटरची बाटली सुरजकुमार यांच्या हातावर मारली. हॉटेल मधील सामानाची तोडफोड सुरु केली. तसेच मद्याच्या बाटल्या देखील तिघांनी फोडल्या. हॉटेलच्या चौथ्या मजल्यावर रामण्णा यांना हा प्रकार सांगण्यासाठी सुरज कुमार जात असतानाच तिघांनी त्याला पाठीमागे ओढत ठोश्या बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यामुळे हॉटेलमध्ये बसलेले इतर ग्राहकांची पळापळ झाली.

ग्राहकांना सेवा देताना 12 हजारांची रक्कम सुरजकुमार यांच्या खिशात होती, ती रक्कम जबरदस्तीने घेऊन तिघांनी तेथून पळ काढला आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शाळा ५ किमी अंतरावर असेल तर विद्यार्थ्याला ६००० रुपये मिळणार, सरकारची मोठी घोषणा, योजनेचा लाभ कसा मिळवायचा?

Mhada Lottery: म्हाडाला लागणार घरांची लाॅटरी, सर्वसामान्य मुंबईकरांचं होणार स्वप्नपूर्ण; पहा कधी निघणार सोडत?

Pune News : वेश्याव्यवसायास नकार दिल्याने बांगलादेशी अल्पवयीन मुलीला कोंडून मारहाण

Bangladesh Hindu AttacK: हिंदू व्यापाऱ्याला बेदम मारहाण, जीव गेल्यावर मृतदेहावर नाचले हल्लेखोर; बांग्लादेशातील अराजकता थांबेना

Pune Crime : हडपसर, वाकडेवाडी परिसरात अमली पदार्थ जप्त, पाच जणांना अटक

SCROLL FOR NEXT