Mumbai
Mumbai Sakal
मुंबई

डोंबिवली : रेल्वे रुळांवरील फाटका जवळ सीसीटीव्ही गरजेचे

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : लोकलवर दगड फेकणे, धावत्या लोकलमधून ढकलने, एक्स्प्रेसमध्ये लूटमार, मोबाईल चोरी अशा घटना रेल्वे स्थानकांवर, दोन स्थानकाच्या दरम्यान मधील अंतरावर घडत असतात. डोंबिवली (Dombivali) लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्ह्यांची उकल लगेच होण्यासाठी तसेच गुन्हे रोखण्यासाठी रेल्वे रुळांवरील फाटक पॉईंट वर सीसीटीव्ही बसवावेत अशी मागणी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी (Police) कल्याण (Kalyan) रेल्वे अभियंत्यांकडे केली आहे. मात्र गेले 8 महिने हा प्रस्ताव तसाच पडून आहे.

डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवा स्टेशन ते कल्याण पत्रीपुल व अप्पर कोपर रेल्वे स्टेशन ते जूचंद्र स्थानक परिसर येतो. लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हातावर फटका मारुन मोबाईल, पर्स चोरणे, एक्सप्रेस किंवा लोकलमधील प्रवाशांवर दगड भिरकावणे अशा घटना दिवा ते कोपर व ठाकुर्ली स्थानका दरम्यान यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. या घटनांत काही प्रवाशी जखमी झाले, तर काहींना जीव ही गमवावा लागला आहे. यासोबतच रेल्वे रूळ ओलांडणे, रेल्वे अपघात, गून्हे ही घडत आहेत. या गुन्ह्यांची लवकर उकल होण्यासाठी सीसीटीव्ही चा उपयोग होऊ शकतो. यामुळे रेल्वे रुळांवरील फाटका पॉईंटवर सीसीटीव्ही बसविणे अत्यंत आवश्यक आहे.

सीसीटीव्ही नसल्याचा फायदा घेत ट्रॅक परिसरात चोरी, लूटमार यांसोबतच रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याचे लोहमार्ग पोलिसांचे म्हणणे आहे. डोंबिवली लोहमार्ग हद्दीत 6 ठिकाणी सीसीटीव्ही बसविणे यासोबतच कल्याण पत्रीपुला शेजारील पुश थ्रू बोगद्याच्या बाजूला असलेल्या जागेत आरपीएफ पोलीस चौकी उभारावी अशी मागणी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी कल्याण रेल्वे अभियंता विभागाकडे मार्च महिन्यात केली आहे. मात्र अद्याप या मागणीचा विचार केला गेलेला नाही.

गुन्हेगारी चे प्रमाण पाहता रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर या परिसरात सीसीटीव्ही लावावे अशी मागणी लोहमार्ग पोलिसांसोबत रेल्वे प्रवाशीही करत आहेत.

फटका पॉईंट ठिकाण

अ.क्र. रेल्वे कि.मी. लाईन क्रॉसिंग व फटका पॉइन्ट ठिकाण

1 . 51/ 542 पत्री पुल जवळ नाल्याच्या बाजूला, पॅराडाईट बिल्डोग कंपाऊड कल्याण (पश्चिम)

2 . 47/06 ते 47/10 कोपर स्टेशन जवळ (कोपर ते डोंबिवली रेल्वे स्टेशन दरम्यान)

3. 48/1 भोपर गाव जवळ अपर कोपर ते लोअर कोपर दरम्यान ट्रैक सर्कल

4 . 42/102 ते 42/204 दिवा रेल्वे स्टेशन जवळ क्रिश बिल्डींग समोर दिवा-कोपर रेल्वे स्टेशन दरम्यान

5 . 51/607 या ठिकाणी रेल्वेचे स्लिपर स्टोर केलेले आहेत

6 . 50/26 ते 50/33

गावदेवी मंदीराच्या शेजारी (लाईन क्रॉसिंग पॉइंट)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Latest Marathi News Live Update : पश्चिम रेल्वेवर दादर येथे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गाड्या 15 ते 20 मिनिट उशिराने

SCROLL FOR NEXT