Alcohol production sakal media
मुंबई

देसाई - आगासन खाडी परिसरातील आठ गावठी दारुच्या हातभट्ट्या नष्ट

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : राज्य उत्पादन शुल्क विभागाने (Excise Department) गावठी दारू निर्मिती (illegal Alcohol production) विरोधात धडक मोहिम हाती घेतली आहे. गेल्या 12 दिवसांत देसाई व आगासन खाडी परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या 8 गावठी दारू हातभट्टीवर कारवाई करत 35 हजार लिटर रसायन (Alcoholic chemical) व 140 लिटर गावठी दारू असा सुमारे 8 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आल्याची माहिती डोंबिवली विभागीय कार्यालयाचे वरीष्ठ निरीक्षक अनिल पवार (Anil Pawar) यांनी दिली.

अवैधरित्या दारू निर्मिती व विक्री वर बंदी असतानाही हातभट्टीवर गावठी दारू बनवून त्याची विक्री चोरी छुपे सुरू असते. नववर्ष स्वागत पार्टी, कार्यक्रमच्या निमित्ताने गावठी दारूला मागणी देखील जास्त असते. यामुळे ग्रामीण भागात खाडी किनारी परिसरात या हातभट्ट्या तयार केल्या जातात. विषारी दारू पिल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गावठी दारूचे अड्डे उध्वस्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप ,विभागीय आयुक्त सुनील चव्हाण व ठाणे जिल्हा अधीक्षक निलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार, दुय्यम निरीक्षक विश्वजित आभाळे, दुय्यम निरीक्षक मल्हारी होळे, जवान देवकाते ,प्रीती पाटील, अमृता नगरकर यांच्या पथकाने खाडीत उतरून हे गावठी दारूचे अड्डे नष्ट केले आहेत.

अवैधरित्या दमन दारू, गोवा दारू किवा गावठी दारूची निर्मिती किवा विक्रीची माहिती नागरिकांना असेल तर त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग डोंबिवली कार्यालयाशी संपर्क साधून माहिती द्यावी. यामुळे विषारी दारू पासून बळी जाणाऱ्या नागरिकांचे आपण प्राण वाचवू शकतो असे आवाहन वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price Today: LPG सिलेंडर 209 रुपयांनी स्वस्त! पेट्रोल, डिझेल आणि CNG चेही नवे दर जाहीर

Maharashtra Loan Waiver: अद्याप २०१७ ची कर्जमाफी प्रलंबित, ६ लाख ६४ हजार शेतकरी ९ वर्षांपासून लाभाच्या प्रतीक्षेत

Corporators Disqualification: महाराष्ट्रात राजकीय खळबळ! 23 नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटिसा; भाजपचे 7, एमआयएमचे 16 सदस्य रडारवर

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये खड्ड्यामुळे पुन्हा अपघात, तरुण गंभीर; डोक्यावर शस्त्रक्रिया

Beed ACB: सुनेत्रा पवारांच्या बैठकीनंतर घरी गेला अन् ४५ लाखांची लाच घेतली; वन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT