Culprit arrested sakal media
मुंबई

डोंबिवली : वृद्धाने केला 9 वर्षीय मुलीवर अतिप्रसंग; आरोपी गजाआड

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : डोंबिवली (Dombivali) पश्चिमेत एका सोसायटीत राहणाऱ्या वृद्धाने 9 वर्षीय मुलीला लाईटचे झुंबर दाखविण्याच्या बहाण्याने घरी नेत तिच्यावर अतिप्रसंग (Minor girl molestation) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात (vishnunagar police) गुन्हा दाखल (police FIR) करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीस अटक (culprit arrested) केली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे.

डोंबिवली पश्चिमेत राहणाऱ्या एका 59 वर्षीय व्यक्तीने त्याच्याच सोसायटी मध्ये राहणाऱ्या एका 9 वर्षीय मुलीवर अतिप्रसंग केल्याची घटना घडली आहे. आरोपी हा सोसायटी मध्ये पाणी सोडायचे काम करत असल्याने त्याची सोसायटीतील प्रत्येकाशी चांगली ओळख आहे. रविवारी दुपारी पीडित मुलीला त्याने लाईटचे झुंबर दाखविण्याच्या बहाण्याने घरी नेले. तेथे चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अतिप्रसंग केला.

पीडित मुलीने घाबरून घरी गेल्यावर आई वडिलांना हा प्रकार सांगितला. पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करताच विष्णुनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी गणेश वडणे यांच्या पथकाने गुप्त बातमीच्या आधारे आरोपीला चार तासात मोठागाव खाडी येथून अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Southwest Monsoon Withdrawal : महाराष्ट्रासह देशातून नैऋत्य मॉन्सूनची माघार; आता ईशान्य मॉन्सून सक्रिय, 'या' भागात ढगफुटीसदृश पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा

Crime News: हिंगोली जिल्ह्यात धक्कादायक घटना; गर्भवती पत्नीच्या मृत्यूनंतर पतीने घेतला गळफास

Diesel Supply Crisis : डिझेल टंचाईचे संकट गडद; दिवाळीनंतर दरवाढीची शक्यता, महागाईची आणखी झळ बसण्याची भीती

Marathi News Live Updates: दुष्काळाच्या झळांनी लोणी गावातील दुग्ध व्यवसाय संकटात, पाणी आणि चाऱ्याअभावी साडेचारशे म्हशींचा सांभाळ कठीण, पशुपालकांवर जनावरे विकण्याची वेळ

Pune Bengaluru Highway Traffic : पुणे-बंगळूर महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी! हिरेबागेवाडी ते हालगा दरम्यान एकेरी वाहतूक सुरू; ऊस दराच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT