raju pati sakal
मुंबई

Dombivali News : भंडार्ली डम्पिंगचा प्रश्न पुन्हा पेटला ; मनसे आमदारांनी व ग्रामस्थांनी अडवल्या घंटागाड्या

घंटागाड्या अडविताच ठाणे महापालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचे पुन्हा एकदा आश्वासन दिले आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - भंडार्ली डम्पिंगचा प्रश्न दिवसेंदिवस पेटू लागला आहे. वारंवार मुदत वाढवून देखील सप्टेंबर अखेर पर्यंत डम्पिंग बंद न झाल्याने रविवारी स्थानिक आमदार राजू पाटील यांसह 14 गाव सर्व पक्षीय विकास समिती व नागरिकांनी डम्पिंगवर जाणाऱ्या घंटागाड्या अडवत आंदोलन केले.

घंटागाड्या अडविताच ठाणे महापालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचे पुन्हा एकदा आश्वासन दिले आहे. तांत्रिक अडचणीमुळे डायघर प्रकल्प सुरू होण्यास आणखी काही दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.

ठाणे महापालिकेच्या भंडार्ली डम्पिंगची मुदत फेब्रुवारी महिन्यात संपली आहे. यानंतरही येथे कचरा टाकण्यात येत असून 14 गावातील ग्रामस्थांनी याला विरोध केला. मागील महिन्यात डम्पिंगवर गाड्या अडवत आमदारांसह ग्रामस्थांनी आंदोलन केले त्यावर आयुक्तांनी महिन्या भराचा कालावधी मागितला होता.

महिना पूर्ण होताच आणखी 15 दिवसांची म्हणजेच 15 सप्टेंबर ची तारीख वाढवून मागवण्यात आली. तेव्हाही डायघर येथील प्रकल्प सुरू न झाल्याने 30 पर्यत मुदत वाढवून मागितली. ही मुदत उलटल्यानंतर देखील डम्पिंग बंद न झाल्याने अखेर रविवारी पुन्हा डम्पिंग वर गाड्या अडवीत आंदोलन करण्यात आले.

यावेळी आमदार पाटील यांनी प्रशासना विरोधात तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला. आमदार पाटील म्हणाले, गावकऱ्यांचा विरोध असताना ही 15 सप्टेंबर वरून 30 सप्टेंबर पर्यंत यांना मुदतवाढ दिलो होती. त्यानंतर ही येथील डम्पिंग बंद झालेले नाही. त्यामुळे आज सर्व गाड्या आम्ही थांबविलेल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी ही अत्यंत नामुष्कीची बाब आहे. आज सगळीकडे स्वच्छता अभियान सुरू आहे. अशा वेळेस तुम्ही तुमचा कचरा इकडे आणून टाकत आहात. आम्हाला काय वाऱ्यावर टाकलं आहे का ? की आम्ही जनावर आहोत... दुसरीकडे कचरा साफ करण्यासाठी इथे टाकतात.

त्यांचे सुपुत्र इथे खासदार आहेत त्यांना काहीच पडलेली नाही. तिकडे अंबरनाथ चा कचरा आमच्या करवले गावात टाकतात. हा गाव आमचा समाज आहे आमच्या समाजावरच कचरा आणून टाकायचा आहे का यांना. कचऱ्याचा प्रश्न निकाली काढण्यात हे दोन्ही पिता पुत्र असफल ठरले आहेत हे खेदाने बोलावे लागते.

आम्ही संधी देतो त्यांना ते मुख्यमंत्री झालेत गडबडीत असतात त्यांना वेळ नाही बाकीच्यांनी तर लक्ष द्यावे. यामुळे आज आम्ही आक्रमक पवित्रा घेतला आहे आम्हाला यांनी लेखी कळवावे की हे कधी बंद होणार अन्यथा येथे घंटागाड्या येऊ देणार नाही आल्या तर जाळून टाकू असा इशारा दिला.

आंदोलनाची माहिती मिळताच ठाणे महापालिका अधिकारी यांनी डम्पिंग येथे धाव घेत आंदोलन कर्त्यांची भेट घेतली. डायघर प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु यामध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. पावसाचा देखील अडथळा त्यात येत आहे. कंत्राटदारवर देखील कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे. मागे झालेल्या सुनावणीनुसार दहा ते बारा दिवसात डायघर येथे पहिली गाडी सुरू करण्यात येईल.

कोणताही प्रकल्प एकदम सुरू करता येत नाही. टप्प्याटप्प्याने त्याचे काम सुरू होते. त्यानुसार दहा ते बारा दिवसात हे काम होईल व भंडार्ली येथील गाड्या बंद होतील. आयुक्तांसोबत बैठक आयोजित करण्यात आली असून निर्णय होईल असे उपायुक्त तुषार पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming: PokerBaazi कंपनीचा शेअर कोसळला, 2 दिवसांत 20 टक्के घसरण; गुंतवणूकदारांचे 2,000 कोटी रुपये बुडाले

Viral Video: इंस्टा जाम, गुलाबी साडीत किन्नरचं सौंदर्य... सोशल मीडियावर धुमाकूळ, चक्क ६.२५ कोटी लोक झाले फिदा!

रोहितनंतर सूर्यकुमार यादवचीही विकेट पडणार? गौतम गंभीर 'लाडक्या'ला कर्णधार करणार

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

Video : तुम्हीपण असा डबा वापरता काय? बाबांनो, जेवणाचं होईल विष, धक्कादायक व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT