wedding esakal
मुंबई

एका लग्नाची गोष्ट! डोंबिवलीत मंगलाष्टका अन् कॅनडात लग्न

वधू-वर कॅनडात अन् भटजी बुवा डोंबिवलीत; ऑनलाइन लग्नाची हटके गोष्ट

शर्वरी जोशी

कोरोना संकटामुळे संपूर्ण जगाचीच घडी विस्कटून गेली आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक ठिकाणी लॉकडाउन करण्यात आला आहे. परिणामी, या लॉकडाउनमुळे अनेक लग्नसोहळे, धार्मिक विधी करण्यावर काही निर्बंध लादण्यात आले. सध्याच्या परिस्थिती केवळ ५० पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न सोहळे करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे काहींनी हे नियम पाळून लग्न केलं. तर, काहींनी त्यांच्या लग्नाच्या तारखा पुढे ढकलल्या. मात्र, या सगळ्या परिस्थितीत एका डोंबिवलीकराने भन्नाट मार्ग शोधून काढला. वधू-वर कॅनडातcanada असून त्यांच्यासाठी खास भटजी बुवांनी ऑनलाइन मंगलाष्टका म्हटल्या आणि लग्नसुद्धा लॅपटॉपकडे पाहुनच लावलं. त्यामुळे डोंबिवलीतील dombivali हा अनोखा लग्नसोहळा चांगलाच चर्चेत आला आहे. (dombivali-online-marriage-from-canada-parents-attend-son-canada-wedding-online)

डोंबिवली पूर्वेकडील भोपर गावात राहत असलेल्या डॉ. हिरामन चौधरी यांच्या मुलाचं ऑनलाइन पद्धतीने लग्न पार पडलं आहे. चौधरी यांचा मुलगा भूषण हा सात वर्षांपूर्वी उच्च शिक्षण घेण्यासाठी कॅनडामध्ये गेला होता. मात्र, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने तिथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. नोकरी करत असतानाच भूषणचं मनदीप कौर या तरुणीवर प्रेम जडलं आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

मनदीप आणि भूषण या दोघांनी एकमेकांना डेट करत असल्याचं आपल्या कुटुंबियांना सांगितलं आणि लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. विशेष म्हणजे दोघांच्याही कुटुंबियांनी त्यांना परवानगी दिली. मात्र, कोरोना संकटामुळे या दोघांनाही भारतात येणं अशक्य झालं. त्यामुळे आता लग्न कसं करायचं हा मोठा प्रश्न दोन्ही कुटुंबासमोर होता. मात्र, यावर भूषण आणि मनदीपने हटके मार्ग शोधून काढला आणि ऑनलाइन लग्न करण्याचं ठरवलं. त्यांच्या या निर्णयात कुटुंबियांनीही साथ दिली.

भूषण आणि मनदीपचं ऑनलाइन लग्न करण्याचं ठरल्यानंतर दोघांच्याही कुटुंबियांनी लग्नाची तयारी सुरु केली आणि लग्नासाठी लागणारं सगळं सामान कुरिअरच्या माध्यमातून कॅनडाला पाठवून दिलं. त्यानंतर २७ जून रोजी ठरलेल्या मुहुर्तावर या दोघांचं लग्न झालं. विशेष म्हणजे या लग्नात भटजी बुवा डोंबिवलीमध्ये चौधरी कुटुंबाच्या घरी बसून ऑनलाइन मंगलाष्टका म्हणत होते.

दरम्यान, डोंबिवलीत असलेल्या भटजींनी ऑनलाइन लाइव्ह व्हिडीओच्या माध्यमातून भूषण-मनदीपचं लग्न लावलं. त्यानंतर दोघांच्याही कुटुंबियांनी ऑनलाइनच अक्षता टाकल्या व दोघांनाही आशिर्वाद दिले. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या लग्नाची चर्चा रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Election 2025 : बिहारमध्ये निवडणुकीआधी 'I.N.D.I.A' आघाडीला मोठा झटका!, आता ‘या’ मित्रपक्षाचाही स्वबळाचा नारा

Crime: पतीचा अश्लील व्हिडिओ बनवला; नंतर पत्नीनं धमकावलं अन्...; जे घडलं त्यानं सर्वच हादरले, प्रकरण काय?

WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅपवर आता अनलिमिटेड मेसेज पाठवता येणार नाहीत; कंपनी आणतेय 'मंथली लिमिट'

AFG vs PAK: पाकड्यांचे शेपूट वाकडे! अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंना मारल्यानंतरही मालिका खेळणवण्यार ठाम; म्हणतात...

Vashi Farmers Protest : पवनचक्कीच्या अधिका-यांना काम करण्यास मज्जाव करुन रोखुण धरणा-या ७० शेतक-यावर गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT