Mumbai Sakal
मुंबई

डोंबिवली : सहा वर्षांपासून मोक्कातील फरार सलमान अखेर जेरबंद

कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : एकट्या महिलांना (Women) हेरून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळी चोरी करणाऱ्या सलमान उर्फ जॅकी पपली इराणी उर्फ हुसेन (वय 31) याला कल्याण (kalyan) गुन्हे अन्वेषण विभाग घटक 3 ने सापळा रचून खडवली येथून अटक केली. सलमान याच्यावर 11 पोलीस (police) ठाण्यात लुटमारीचे गुन्हे दाखल असून मोक्का देखील लावण्यात आला आहे. 6 वर्षांपासून तो पोलिसांच्या हातावर तुरी देत गुन्हे करतच होता. अखेर सापळा रचून सलमानला अटक करण्यात कल्याण गुन्हे शाखेस यश आले आहे.

आंबिवली परिसरात राहणारा सलमान हा मूळचा मध्य प्रदेशातील आहे. विविध पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पोलीस सलमान याचा शोध घेत होते. कल्याण गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार अनुप कामत यांना एका गुप्त बातमीदार मार्फत सलमान हा खडवली परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास पाटील,

पोलिस उपनिरीक्षक मोहन कळमकर, पोलीस हवालदार अनुप कामत, मंगेश शिर्के, सचिन साळवी , सुरेश निकुळे, राहुल ईशी यांनी सापळा रचून शनिवारी सलमानला अटक केली. त्याच्याजवळ 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल आढळून आला आहे.

सलमान याच्या विरोधात मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली तील 11 पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. मोटारसायकल चोरून त्याच चोरीच्या मोटारसायकलचा वापर करून तो महिलांना हेरून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी, मंगळसुत्र चोरत असे. आरोपीस महात्मा फुले चौक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून ते अधिक तपास करीत असल्याचे गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict : डोनाल्ड ट्रम्प नरमले पण इराण युद्ध थांबवणार नाही, सांगितले 'हे' मोठे कारण

Satara Bribery Case: गुण नियंत्रण अधिकारी लाच घेताना ताब्‍यात; सातारा तालुक्यात खळबळ, खत तपासणीसाठी ५० हजारांची लाच, सापळा रचला अन्..

मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना बंद! 2 वर्षे झाले अर्ज करून सोलापुरातील 600 ज्येष्ठ नागरिकांना मिळेना ‘तीर्थदर्शन’; शेवटची इच्छा अपूर्णच, वाचा...

मोठी बातमी! आता प्रत्येक शिक्षकाचे स्वतंत्र प्रोफाईल तयार होणार; माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय; एका क्लिकवर मिळणार ३ लाख शिक्षकांचा बायोडाटा

Panchang 24 March 2026: आजच्या दिवशी ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण आणि ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT