मुंबईः कोपर परिसरात चाकूचा धाक दाखवत एका महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला गेल्याची घटना शुक्रवारी घडली. महिलेने प्रसंगावधान राखीत घरातून पळ काढीत थेट पोलिस स्टेशन गाठल्याने पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात महेश वाघ उर्फ मक्या (वय 26) याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करीत महेशला अटक केली आहे. महेश हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर याआधीही चार गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
डोंबिवली पश्चिमेतील कोपर परिसरात ही धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. महिला घरी एकटी असताना परिसरातील सराईत गुन्हेगार महेश वाघ तिच्या घरात घुसला. धारदार शस्त्राचा धाक दाखवित त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरडा सुरु केल्याने तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक महिलेच्या घरासमोर जमा झाले. मात्र महेशला पाहून कोणीही पुढे येण्याचे धाडस केले नाही. महिलेने न घाबरता घरा बाहेर पळ काढला. यावेळी महेशही तिच्यापाठीमागे चाकू घेऊन धावत होता. महिलेने मदतीसाठी धावा केला. मात्र महेशच्या दहशतीमुळे परिसरातील नागरिकांनी घराचे दार, दुकानाचे शटर खाली केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
महिलेने थेट पोलिस ठाणे गाठीत महेश याच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने महेशला अटक केली. महेश हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात याआधीही चार गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे विष्णूनगर पोलिसांनी सांगितले. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना आळा बसावा म्हणून राज्यात दिशा कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यान्वये आता डोंबिवलीतील पीडित महिलेला न्याय मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
--------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Dombivli Attempt Hurt woman fear knife Accused arrested
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.