Dombivli MIDC Blast esakal
मुंबई

Dombivli MIDC Blast: डोंबिवली पुन्हा हादरली! स्फोटांची मालिका सुरुच...सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह, 8 वर्षात किती स्फोट झाले?

Dombivli MIDC Blast: डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा स्फोट झाला आहे. डोंबिवली पुर्व फेज 2 मध्ये एका कंपनीत हा भीषण स्फोट झाला आहे. यापूर्वी देखील डोंबिवलीत स्फोट झाले आहेत.

Sandip Kapde

Dombivli MIDC Blast:

ठाण्यातील डोंबिवली एमआयडीसी परिसरातील एका कारखान्यात पुन्हा मोठा स्फोट झाला आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र अनेकजण या कारखान्यात अडकल्याची भिती आहे. मोठे स्पोट या कंपनीत होत आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल आहेत. आग विझवण्याचे काम सुरु आहेत.

एक महिन्यापूर्वी डोंबिवली एआयडीसीमध्ये मोठा स्फोट झाला होता. हा स्फोट एवढा भीषण होता की या परिणाम आजूबाजूच्या परिसरावर देखील झाला होता. अनेक नागरिक जखमी झाले होते यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश होता. काही मृतदेह तर सापडले सुद्धा नाहीत. दरम्यान डोंबिवली एआयडीसीमध्ये स्फोटांची मालिका सुरुच आहे. त्यामुळे सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.

यापूर्वी २४ मे २०१६  डोंबिवली एआयडीसीमध्ये मोठी आग लागली होती. आता २३ मे २०२४ ला त्याची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा आहे. २०१६ ला असाच एका केमिकल कंपनीत स्फोट झाला होता त्यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला होता तर १६० पेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले होते. हजारो घरांच्या काच्या फुटल्या होत्या. आता देखील सारखीच परिस्थिती आहे.

२०१६ मध्ये नेमकं काय घडलं होतं?

प्रो बेस एंटरप्रायझेस या डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीत सकाळी ११.३० च्या सुमारास बॉयलरचा स्फोट झाला होता. हा स्फोट इतका जबरदस्त होता, की शेजारी असलेल्या सहा कारखान्यांचे यात मोठे नुकसान झाले होते. स्फोटाच्या भयावह आवाजाने संपूर्ण शहर हादरले. दोन-अडीच किलोमीटरपर्यंतची घरे तसेच दुकानांच्या काचा फुटल्या. या स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला होता १६० जण जखमी झाले होते.

या स्फोटामुळे काही जणांच्या कानांचे पडदेही फाटल्याची माहिती होती. डोंबिवलीतील स्कायवॉकवरूनही हे धुराचे प्रचंड लोट उसळताना दिसत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. याविषयी उच्चस्तरीय चौकशी केली जाईल व जखमींवरील औषधोपचारांचा खर्च सरकार करील, असे सांगण्यात आले होते. मात्र डोंबिवली स्फोटांची मालिका सुरुच आहे.

त्यावेळी शिवाजीनगर परिसरातील प्रो बेस एंटरप्रायझेस या कारखान्यात हा स्फोट झाला होता. मोनोक्रोम बेन्झिन (एमसीबी) या सॉल्व्हंटचा हा स्फोट असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता.. स्फोट इतका जबरदस्त होता, की ही कंपनी तर बेचिराख झाली होती.  

२०१७ मध्ये देखील नोव्हेंबर महिन्यात देखील स्फोट झाला होता. ऍल्यू-फीन कंपनीत कॉम्प्रेसरच्या स्फोटात दोन कामगार जखमी झाले. जखमींपैकी एका कामगाराची प्रकृती चिंताजनक होती. फेज दोनमधील ऍल्यू-फीन कंपनीत ऍल्युमिनियमला कोटिंग केले जाते. सकाळच्या सत्रात या कंपनीत राजेंद्रसह चार कामगार होते. राजेंद्र हे कॉम्प्रेसरचा व्हॉल्व्ह बंद करण्यासाठी गेले असताना स्फोट झाला होता. कंपनीतील कॉम्प्रेसरची हवा पास न झाल्याने हवेचा दाब निर्माण झाल्याने स्फोट झाल्याचा अंदाज त्यावेळी व्यक्त करण्यात आला होता.

२०१८ मध्ये देखील झाला होता भीषण स्फोट -

२०१८ च्या सप्टेंबर महिन्यात डोंबिवलीत औषध कारखान्यातील अणुभट्टीचा स्फोट होऊन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) परिसरातील रहिवाशांची झोप उडाली होती. यानंतर अग्निशमन दल आणि मानपाडा पोलिसांना माहिती दिली होती. अग्निशमन दलाने कोणतीही मोठी हानी न झाल्याची पुष्टी केली आणि काही तासांतच परिसर सुरक्षित घोषित केला. मानपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी फेज २ येथील आर्क फार्मास्युटिकल्समध्ये पहाटे दीडच्या सुमारास स्फोट झाला होता.

टाटा पॉवरजवळील भंगार गोदामाला आग-

यावर्षी २१ मार्चला देखील आग लागली होती. डोंबिवली (पूर्व) येथील टाटा पॉवरजवळील भंगार गोदामाला आग लागली होती. कॅम्पसमध्ये अशी अंदाजे ४० ते ५० भंगार गोदामे असल्याचे सांगण्यात येत आहे, जे केवळ पत्रे जोडून बांधले गेले आहेत. त्यात प्लॅस्टिकच्या बाटल्या, कपडे आदी अनेक वस्तू ठेवण्यात आल्याने आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केले. काही वेळातच आगीत ३० ते ४० भंगार गोदामे जळून खाक झाली होती. आगीमुळे परिसरात धुराचे ढग पसरले. आग इतकी भीषण होती की कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ भागातून अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करावे लागले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

AI Dictionary : एआयची 'ही' डिक्शनरी तुम्हाला बनवून टाकेल टेक-गुरु, जगभर का आहे ट्रेंडिंग? पाहा एका क्लिकवर

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

SCROLL FOR NEXT